
मुंबई - ‘सामाजिक न्याय, आदिवासी विकास आणि इतर बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या नवीन सहकारी सूतगिरण्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत एकसमान निकष ठरवावे. तसेच वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी वस्त्रोद्योग आणि ऊर्जा विभागाची समिती स्थापन करण्यात यावी,’ असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.