
पुणे : महाराष्ट्रामधील जबाबदारीची भूमिका बजावणाऱ्या पोलिस दलावरील कामाचे ताण कमी करण्यासाठी १० हजार जागांवर पोलिस शिपाई भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. यामुळे पोलिस होण्याची इच्छा असलेले अनेक तरुण तयारीला लागले आहेत.
जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीच्या काळात शहरी व ग्रामीण भागातील तरुणांना पोलिस भरतीच्या माध्यमातून नोकरी मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत पोलिस भरतीबाबत निर्णय झाला होता. तेव्हापासून तरुणांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. वर्षभरात ही भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पोलिस भरतीसाठी काय तयारी करावी, कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत. आरक्षण कसे असेल, अर्ज कसा करावा याची माहिती व्हायरल होत आहे. यातूनच एका मेसेजमधून आलेली माहिती...
वयाची अट
पोलिस भरती होण्यासाठी खुल्या वर्गासाठी : १८ ते २८
कास्ट : १८ ते३३
मराठा Esbc : १८ ते ३३
एसआरपीसाठी...
खुल्या वर्गासाठी फक्त मुले : १८ ते २५
कास्ट : १८ ते ३०
मराठा : १८ ते ३०
ड्रायव्हर...
खुल्या वर्गात : १९ ते २८
कास्ट : १९ ते ३३
मराठा Esbc : १९ ते ३३
बँड...
फक्त मुले खुल्या वर्गात : १८ ते २८
कास्ट : १८ ते ३३
मराठा Esbc : १८ ते ३३
शिक्षण : बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष किंवा ( बँड पथक १० वी उत्तीर्ण)
उंची : मुलाचे १६५ सेमी तर मुलीचे १५५ सेमी, SRPF : फक्त मुले १६८ सेमी, ड्रायव्हर : मुलाचे १६५ सेमी तर मुलीचे १५८ सेमी, बँड पथक : फक्त मुले १६३ सेमी
आवश्यक कागदपत्रे
- दहावी, बारावीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र
- महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल)
- शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला (L.C.)
- आधार कार्ड
- कास्ट सर्टिफिकेट (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)
- नॉन क्रिमीलेयर (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)
- लग्न झालेले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी (विवाहीत स्त्री)
- ड्रायव्हर पदासाठी हलके वाहन चालवण्याचा TR परवाना असावा.
लेखी परीक्षेसाठी पहिला टप्प्त्यात लागणारे १०० गुण ...
- मराठी २५, गणित २५, बुद्धिमत्ता २५, सामान्य अध्ययन व चालू घडामोडी २५
- (फक्त ड्राइव्हर)- मराठी २०, गणित २०, बुद्धिमत्ता २०, सामान्य अध्ययन व चालू घडामोडी २०, वाहतूक २०)
मैदानी परीक्षेसाठी दुसरा टप्प्यात लागणारे ५० गुण ...
मुले : छाती = ७९ सेमी ते फुगवून पाच अधिक सेमीने वाढावी
१६०० मी = (५ मी. १० सेकंद - ३० गुण)
१०० मी = (११.५० सेकंद - १० गुण)
गोळाफेक = (८.५० मीटर पेक्षा जास्त - १० गुण)
-
मुली...
८०० मी = (२ मी. ५० सेकंद - ३० गुण)
१०० मी =(१४ सेकंद - १० गुण)
गोळाफेक = (६ मीटर पेक्षा जास्त - १० गुण)
SRPF मैदानी १०० गुण...
फक्त मुले
छाती = ७९ सेमी ते फुगवून ५ अधिक सेमीने वाढावी
५ किमी = (२५ मी - ५० गुण )
१०० मी = (११.५० सेकंद- २५ गुण )
गोळाफेक = (८.५० मीटर पेक्षा जास्त - २५ गुण)
ड्रायव्हर मैदानी ५० गुण...
मुले : छाती = ७९ सेमी ते फुगवून ५ अधिक सेमीने वाढावी
१६०० मी = (५ मी १० सेकंद - ३० गुण )
गोळाफेक = (८.५० मीटर पेक्षा जास्त - १२ गुण)
मुली : ८०० मी = (२ मी. ५० सेकंद - ३० गुण)
गोळाफेक = (६ मीटर पेक्षा जास्त - २० गुण)
(ड्रायव्हर पदासाठी वाहन चालवणे ५० गुण)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.