
नागपूर - राज्य सरकारने १४ लाख १३ हजार टन सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट समोर ठेवले. वारंवार मुदतवाढ देऊनही केवळ चार लाख २६ हजार ८७ टन सोयाबीन खरेदी झाली आहे. खरेदीसाठी आता ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतीतही उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, असे शेतकरी विचारत आहेत.