महापरिनिर्वाण दिनानिमित्त पश्चिम रेल्वेच्या विशेष सोयीसुविधा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

western railway

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातील लाखो अनुयायी मोठ्या संख्येने रेल्वेने येतात.

Western Railway : महापरिनिर्वाण दिनानिमित्त पश्चिम रेल्वेच्या विशेष सोयीसुविधा!

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातील लाखो अनुयायी मोठ्या संख्येने रेल्वेने येतात. या आंबेडकर अनुयायांची दादर रेल्वे स्थानकात गैरसोय होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वेने जोरदार तयारी केली आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी दादर रेल्वे स्थानकात मदत कक्ष उभारण्यात आलेल्या आहे. दादर स्थानकात चैत्य भूमि आणि राजगृह स्मारक दिशादर्शक फलक मराठी, हिंदी , इंग्रजी भाषेत असणार आहे. स्थानकांबाहेर आगमन , बाहेर पडण्याची ठिकाणे ,यासह इतर बाबींबाबत सूचना फलक स्थानकांवर लावण्यात आले आहे. नागरिकांना स्थानकांवर ये-जा करण्यासाठी योग्य उपाययोजना आणि नकाशा तयार करण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वे स्थानकावर आरपीएफ आणि जीआरपीचे ४५० कर्मचारी तैनात असणार आहे. नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी मेगाफोन व्दारे घोषणा आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना कारण्यासाठी रेल्वे निरीक्षकांची टीम २४/७ उपलब्ध असणार आहे.

तिकीट सुविधा -

  • दादर आणि जवळील स्थानकात अतिरिक्त तिकीट काउंटर सुरू करण्यात आले आहे.

  • एटीव्हीएमवर अतिरिक्त फॅसिलिटेटर अतिरिक्त तिकीट काउंटर कर्मचारी ,तिकीट तपासनीस असणार आहे. जेणेकरून तिकीट खिडक्यावर प्रवाशांची गर्दी होणार नाहीत.

प्रवाशांसाठी सुविधा

  • पिण्याचे पाणी, चमकणारे सूचना फलक, - खाण्याची व्यवस्था

  • कॅटरिंग युनिटला सकाळी लवकर खोलण्याचे आणि रात्री शेवटच्या गाडी पर्यंत चालू ठेवण्याच्या सूचना

  • दादर स्थानकात अतिरिक्त शौचालय व्यवस्था

  • प्लॅटफॉर्म पाचच्या वाहन बाजूला पार्किंग सुविधा

  • लिफ्ट और एस्केलेटर चालविण्यासाठी कर्मचारी तैनात

वैद्यकीय मदत कक्ष

- दादर स्थानकात २४ तास आपत्कालीन किट सह डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध

- पोर्टेबल मेडिकल किट सह वांद्रे रुग्णवाहिका ७ डिसेंबर पर्यंत उपलब्ध

- प्लॅटफॉर्म ६ वर ईएमआर सुविधा

- स्थानकांवर अधीक्षक / स्टेशन मास्तर जवळ वैद्यकीय टीमची माहिती उपलब्ध