

SSC HSC Supplementary Exams
पुणे - राज्यात दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा मंगळवारपासून (ता. १६) सुरू होत आहे. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण ४८ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या परीक्षेसाठी एक लाख चार हजार ४९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (राज्य मंडळ) सचिव डॉ. दिपक माळी यांनी दिली.