

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुन-जुलैमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून सुरू होणार आहे. राज्य मंडळाने पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पुरवणी परीक्षा लवकर सुरू करण्यात येत आहे.