ssc board pune
sakal
पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या सोमवारपासून (ता. १५) सुरू होणार आहे. दहावीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे अर्ज ‘युडायस प्लस’मधील पेन-आयडीवरून ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या शाळांमार्फत भरून घेण्यात येणार आहेत.