esakal | ब्रेकिंग : दहावीच्या परीक्षा रद्द; बारावीच्या परीक्षा होणार!

बोलून बातमी शोधा

ब्रेकिंग : दहावीच्या परीक्षा रद्द; बारावीच्या परीक्षा होणार!
ब्रेकिंग : दहावीच्या परीक्षा रद्द; बारावीच्या परीक्षा होणार!
sakal_logo
By
टीम ई सकाळ

राज्यात कठोर निर्बंध लावून सुद्धा कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली नाही. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. काही तासांत लॉकडाऊनबाबतच्या गाईडलाईन्स जारी करण्यात येतील, असंही ते म्हणाले आहेत. तर दुसरीकडे राज्यातील 10 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत तर 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आज मंगळवारी मंत्रीमंडळाची बैठक झाली असून यामध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

‘‘दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला असला, तरी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठविले जाईल. दहावीत जास्त गुणांची अपेक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा कशी घ्यायची, तसेच बारावीच्या परीक्षा कधी आणि कशा पद्धतीने घ्यायच्या याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल,’’ अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव आणि मंत्रीमंडळात झालेल्या निर्णयाबाबत पत्रकारांशी बोलताना ‘दहावीच्या परीक्षा रद्द आणि बारावीच्या परीक्षा होतील’, असा निर्णय जाहीर केला. त्यानंतर गायकवाड यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा: मोठी बातमी! राज्यात कडक लॉकडाऊन लागणार

त्या म्हणाल्या, ‘‘कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत १२ एप्रिलला बैठक झाली. त्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. त्याचवेळी सीबीएसई, आयसीएसई अशा अन्य बोर्डांना देखील ‘आपणही दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घ्यावा’, अशी विनंती केली. त्याप्रमाणे अन्य बोर्डांनी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. तर बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतला. त्याप्रमाणे शालेय शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे हे विद्यार्थी पुढे कसे गेले पाहिजेत, या संदर्भात चर्चा करून निर्णय लवकरच जाहीर केला जाईल. तसेच जास्त गुणांची अपेक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा कशी घ्यायची, याबाबतही भविष्यात निर्णय घेण्यात येईल. परंतु सर्व बोर्डांच्या निर्णयामध्ये समानता असावी, त्यादृष्टीने निर्णय घेतला आहे.’’

याआधी सीबीएसई आणि आयसीएसई यांच्याही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यानंतर आता SSC बोर्डाची दहावीची परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. देशातील इतर सात राज्यांमध्ये परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसई आणि आयसीएसईच्या बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.