महाराष्ट्रात शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

state board maharashtra

महाराष्ट्रात शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी

पुणे : इयत्ता नववी ते दहावी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षा संपवून ३० एप्रिलपर्यंत निकाल जाहीर करण्याची सूचना 'राज्य शिक्षण मंडळा'ने शाळांना दिली आहे. उष्णतेची तीव्र लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर ही सूचना देण्यात आली आहे.

हेही वाचा: ब्रेकिंग - आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बरखास्त....

राज्याच्या शिक्षण विभागाने मंगळवारी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षा, मूल्यमापन आणि निकाल ही सर्व कामे ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश राज्यातील सर्व शाळांना देण्यात आले आहेत. तसेच उन्हाळी सुट्टी २ मे ते १२ जून या कालावधीत असणार आहे. २०२२-२३ हे नवे शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू होणार आहे. अलीकडे महाराष्ट्रातील उन्हाळा अधिकाधिक तीव्र होत असल्याने विदर्भातील शाळा २७ जूनपासून सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे.

यापूर्वी इयत्ता दहावी आणि बारावीच्या शालांत परीक्षा राज्य शिक्षण मंडळाने यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. या दोन्ही परीक्षांच्या निकालाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरीही, मे आणि जूनमध्ये हे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

Web Title: Ssc Hsc State Board Exams And Results 1st To 9th And 11th

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top