

The Maharashtra SSC HSC Supplementary Result 2026 will be declared online on July 14 at 1 PM.
Sakal
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता. १४) दुपारी एक वाजता ऑनलाइनद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत जुन-जुलैमध्ये ही पुरवणी परीक्षा घेण्यात आली. मंडळाच्या https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.