esakal | SSC Result 2021: मोठी बातमी, दहावीचा निकाल उद्या
sakal

बोलून बातमी शोधा

SSC Result 2021: मोठी बातमी, दहावीचा निकाल उद्या

SSC Result 2021: मोठी बातमी, दहावीचा निकाल उद्या

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

SSC Result 2021: महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी दुपारी राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांच्या निकालाची घोषणा होणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबतची माहिती दिली आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 4 हजार 441 विद्यार्थी उपस्थित होते. करोना पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाल्याने मूल्यांकन पद्धतीनुसार हा निकाल लागणार आहे. यापैकी साधारण 15 लाख 92 हजार 418 हून अधिक विद्यार्थ्यांचे गुण कॉम्प्युटर सिस्टीममध्ये अपलोड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता सरसकटपणे उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अंतर्गत गुण आणि त्यांच्या मूल्यमापन संदर्भात 10 जूनपासून शाळा स्तरावर कार्यवाहीला सुरुवात झाली होती. ही कार्यवाही ३ जुलै पर्यंत पूर्ण करून राज्य शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल 15 जुलै पर्यंत जाहीर केला जाणार होता. आता एक दिवस उशीरा निकाल जाहीर होणार आहे.,

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लेखी परीक्षा न होता, अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे राज्यातील जवळपास १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या ‘http://result.mh-ssc.ac.in’ या संकेतस्थळावर विषयनिहाय मिळालेले गुण संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.

राज्य शिक्षण मंडळामार्फत २९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यांचे अधिकृत आदेश १२ मे रोजी काढण्यात आला. त्यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याचे ठरले आणि तसा अधिकृत आदेश २८ मे रोजी राज्य सरकारने काढला. त्यानुसार विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आणि ते संगणक प्रणालीमध्ये नोंदविण्यासाठी माध्यमिक शाळांना २३ जूनपासून ते ९ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली. शाळांकडून संगणक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांचे गुण विभागीय मंडळाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर विभागीय मंडळाने शाळांकडून आलेले अंतर्गत गुण एकत्रित करून विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल तयार करण्यासाठी प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठविले. त्यानंतर राज्य स्तरावर १५ जुलैपर्यंत निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात आली.

दहावीच्या परीक्षेसाठी बसलेले विद्यार्थी :

विद्यार्थी : ९,०९,९३१

विद्यार्थिंनी : ७,४८,६९३

एकूण : १६,५८,६२४

- निकाल पाहण्यासाठी लिंक : http://result.mh-ssc.ac.in

- शाळांना एकत्रित निकाल पाहण्यासाठी : www.mahahsscboard.in

निकालाबाबतचा तपशील :

- इयत्ता नववीचा अंतिम निकाल, दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन याच्या आधारे विषयनिहाय होणार गुणदान

- संबंधित संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येतील.

- विषयनिहाय एकत्रित निकाल प्रिंट काढता येईल

loading image