ST Bank : एसटी बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने करावी; काँग्रेसची मागणी

ST bank news
ST bank newsSakal

मुंबई : तब्बल चार हजार कोटी आर्थिक उलाढाल असलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑफ बँकेत कोरोना काळातील जे दोन वर्षाचे समवर्ती तपासणी ( काँक्रंट ऑडिट) मध्ये प्रचंड अनियमीतता आहे त्याची चौकशी सहकार खात्याकडून सुरू आहे. मात्र, या चौकशीची फार गंभीरता घेतली जात नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या घामातून व कष्टातून उभ्या असलेल्या बँकेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याची दाट शंका आहे.

बँकेच्या काँक्रट ऑडिट म्हणजेच समवर्ती तपासणी प्रकरणाची चौकशी सहकार खात्याकडून न करता पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करावी अशी मागणी महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

ST bank news
Devendra Fadnavis On ED Raids : मुंबईत ठाकरेंच्या निकटवर्तीयांच्या घरांवर ईडीचे छापे; फडणवीस म्हणाले…

एसटी बँक आणि सभासदांसमोर अनेक अडचणी असताना त्याकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष केले जात असून मुद्दे माहिती नसलेले लोक या बँकेत घुसखोरी करण्याचे प्रयत्न करीत आहेत.

होऊ घातलेल्या बँक निवडणुकीत मुख्य मुद्द्यांना सोयीस्कररिऱ्या बगल दिली जात असून ज्यांचा बँकेच्या उभारणीत किंवा जडणघडणीत काहीही संबंध नाही. अशा राजकीय नेत्यांचे फोटो लावून त्यांच्या नावे बँक निवडणुकीत मते मागितली जात आहेत. हे दुर्दैवी असल्याचे मतही श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे.

कर्मचाऱ्याच्या हितासाठी एसटी बँकेची स्थापना करण्यात आली आहे. बँकेचे ७० हजार सभासद असून बँकेची ४ हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल आहे. कोरोना काळात ऑडिट झाले नव्हते, त्यामुळे शाखानिहाय ऑडिटर नेमले गेले.

आश्चर्य म्हणजे त्यांनी दोन वर्षाचे ऑडिट एक -दोन दिवसात करून टाकले. त्यासाठी प्रतिशाखेतून तब्बल ८० हजार तर एकूण राज्यभरात संपूर्ण ऑडीटसाठी बँकेकडून सुमारे ६५ लाख रुपये संबंधितांनी लाटले असल्याचा आरोप सुद्धा बरगे यांनी केला आहे.

ST bank news
Darshana Pawar Case: दर्शना पवार हत्या प्रकरणात पोलिसांना संशय असणारा तिचा मित्र राहुल हांडोरे कोण आहे?

बँकेच्या ५० शाखा व ११ विस्तार केंद्र आहेत. सर्व आगारात एटीएम सेंटर उभी करून खातेदारांना सुविधा पुरविल्या पाहिजेत. गरज नसलेल्या शाखा व विस्तार केंद्र बंद केली पाहिजेत. सभासदांनी कर्ज घेतल्यावर त्यावर जे व्याज लावले जाते ते कमी करणे आवश्यक आहे. पण हे करण्यात सुद्धा अडचणी आहेत.

बँक फक्त ३ टक्क्यांवर चालत आहे. कर्जावरील व्याज कमी केल्यास बँक चालवणे मुश्किल होईल. म्हणून काही अनावश्यक शाखा व विस्तार केंद्र कमी करून त्यावर होणारा खर्च कमी करून सभासदांच्या कर्जावरील व्याजदर कमी करायला हवा.

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com