आंबेनळी घाटात एसटी बस कोसळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेनळी घाटात एसटी बस कोसळली

महाड येथून अक्कलकोटला येणारी एसटी बस आंबेनळी घाटात कोसळली

- 15 प्रवासी जखमी

आंबेनळी घाटात एसटी बस कोसळली

सोलापूर : महाड येथून अक्कलकोटला येणारी एसटी बस आंबेनळी घाटात कोसळली. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना महाबळेश्‍वर परिसरात घडली. अपघातानंतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

ही एसटी बस मुक्कामी महाडला असते. प्रतापगडपासून पोलादपूरला जाणाऱ्या घाटातून ही बस खाली गेली. पण खाली कोसळलेली ही बस झाडात अडकली. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवाशांचा जीव वाचवला आहे. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.