
Latest Mumbai News: दररोज ५५ लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळ गेली ७६ वर्षे काम करीत आहे. रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी चालकांचे सुयोग्य प्रशिक्षण, त्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ करणे, याबरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष बस उपलब्ध करून देणे, या त्रिसूत्रीवर यापुढे भर देण्यात येत असून,
प्रवाशांची सुरक्षितता हेच एसटीचे अंतिम ध्येय राहील, असे प्रतिपादन एसटीचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले यांनी येथे आज केले. कर्मचाऱ्यांचे वाढते वेतन, इंधनाचा वाढता दर, टायर आणि सुट्या भागांची वाढती किंमत हे विचारात घेऊन २०२१ पासून प्रलंबित असलेली एसटीची तिकीट भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव लवकरच शासनाला सादर केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.