राज्यातील प्रत्येक विभागातील जास्तीत जास्त 10 गाड्या 'यासाठी' तयार ठेवा, ST महामंडळाचे महत्त्वाचे आदेश

राज्यातील प्रत्येक विभागातील जास्तीत जास्त 10 गाड्या 'यासाठी' तयार ठेवा, ST महामंडळाचे महत्त्वाचे आदेश
Updated on

मुंबई : राज्यात 22 मार्च पासून लाॅकडाऊन असल्याने राज्यातील प्रवासी वाहतूक बंद आहे. त्यामूळे एसटीचे उत्पन्न घटले आहे. अशा परिस्थितीमध्ये एसटीने आता, मालवाहतूकीकडे अधिक लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 31 विभागांमध्ये 10 वर्षांचे आयुर्माण झालेल्या आणि 6.50 लाख किलोमीटर धावलेल्या बसचे प्रत्येकी 10 प्रवासी वाहनांचे मालवाहतूकीमध्ये रुपांतरीत करण्याचे आदेश एसटी महामंडळाने दिले आहे. 

राज्यातील प्रत्येक विभागामध्ये जास्तीत जास्त 10 गाड्या मालवाहतूकीसाठी तयार करण्याचे आदेश एसटी महामंडळाने राज्यातील विभागीय नियंत्रकांना दिले आहे .यामध्ये प्रमाख्याने 10 वर्ष झालेल्या आणि 6.50 लाख किलोमीटर धावलेल्या एसटीची मालवाहतूकीमध्ये रुपांतरण करण्यात येणार आहे. तर मुंबईत येणारी गाडी मालवाहतूकीसाठी आणायचे असल्यास, त्या गाडीचे वय आठ वर्ष आणि साडे 6.50 लाख किलोमीटर पेक्षा जास्त धावलेली नसणाऱ्या गाड्यांचेच मालवाहतुकीसाठी रुपांतरण करून वापरण्यात येणार आहे.

मुंबई, नाशिक, पुणे या तिन विभागांना यापुर्वीच एसटी महामंडळाने प्रत्येकी दोन वाहनांना सहा वर्ष आणि 6,50 लाख किलो मिटर धावलेल्या बसचे मालवाहतूकीसाठी रुपांतरण करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, यापैकी नाशिक, पुणे येथे प्रत्येकी एक बस तयार करण्यात करायच्या आहे. मात्र, मुंबई विभाग वगळता, नाशिक, पुणे विभागाने प्रत्येकी एका वाहनांचे रुपांतरण पुर्ण केल्याने, दुसरे वाहन रुपांतरीत न करण्याचे आदेश एसटीने दिले आहे. 

तर मुंबई विभागाने मालवाहतूकीच्या आवश्यकतेनुसार सहा वर्ष आणि साडे सहा लाख किलोमीटर पुर्ण झालेल्या जास्तीत जास्त वाहनांचे मालवाहतूकीसाठी आवश्यक वाहनांचे रुपांतरण करण्याचे एसटीने सांगितले आहे. तर राज्यातील 31 विभागांमध्ये 10 प्रवासी वाहनांचे मालवाहतूकीसाठी व व्यवसायाची व्याप्ती लक्षात घेऊनच रुपातंरण करण्याचे एसटीने राज्यातील विभाग नियंत्रकांना आदेश दिले आहे. 

राज्यात सध्या प्रत्येक डेपोमध्ये प्रत्येकी एक म्हणजेत राज्यात सुमारे 250 एसटीचे ट्रॅक आहे. त्यामध्ये एसटीतील साहित्य वाहुन नेण्यासाठी वापर केला जातो. त्याचाच वापर सध्या मालवाहतूकीसाठी केला जात आहे. मालवाहतूकीसाठी वाहनांची संख्या वाढवावी म्हणून आता, एसटीने प्रवासी वाहनांचे रुपांतरण मालवाहतुकीत वाहनांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामूळे प्रत्येक विभागाने 10 ट्रक तयार केल्यास 310 मालवाहतुकीसाठी वाहने तयार होणार आहे.

ST corporation gave orders to keep maximum 10 buses ready for goods carrier

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com