एसटीच्या 2296 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवामुक्तीच्या नोटीस | ST bus corporation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus Employee

एसटीच्या 2296 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवामुक्तीच्या नोटीस

मुंबई : एसटी कर्मचारी (St employee) महामंडळाचे विलीनीकरणाच्या मागणीवर (merge demand) ठाम असून संप मागे घेण्याची शक्यता दिसत नसल्याने एसटी महामंडळाने (ST bus corporation) कंत्राटी कर्मचाऱ्यांवर (contract employee) कारवाई सुरू केली आहे. बुधवारी तब्बल 2296 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवामुक्तीच्या नोटीस (Notice of retirement) पाठवल्या आहे. शिवाय निलंबीत कर्मचाऱ्यांची सुद्धा सेवामुक्ती करण्याचा इशारा एसटी महामंडळाने दिला आहे.

हेही वाचा: कल्याण : मुंगूसाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक

27 आॅक्टोंबर पासून बेमुदत उपोषणामध्ये एसटीचे कर्मचारी सहभागी झाले होते. त्यानंतर संयुक्त कृती समितीने भत्यांच्या दोन मागण्या पुर्ण झाल्यानंतर उपोषण मागे घेतले. मात्र, त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला, भाजप नेत्यांनी या संपाला पाठिंबा देऊन राज्यभरातील आगार बंद पाडले. दरम्यान सध्या 250 आगार बंद असून, एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम दिसून येत आहे.

परिवहन मंत्र्यांच्या बंगल्यारून संप फोडण्यासाठी प्रयत्न सुरू असतांना, मंगळवारी एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी संघंटनांच्या नेत्यांनी पुणे, नाशिक आणि मुंबई विभागातील काही आगारांमध्ये जाऊन संघंटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संप मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र, संपकर्त्यांनी एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱी संघंटनांच्या पदाधिकाऱ्यांचा मनसुबा यशस्वी होऊ दिला नाही.

6 वाजेपर्यंत 107 बसेस रस्त्यावर

एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केल्यानंतर काही कर्मचारी कामावर रुजू झाल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. त्याप्रमाणे शिवनेरी, शिवशाही आणि साध्या बसेस मधून प्रवासी वाहतुक केली जात आहे. बुधवारी राज्यभरात 107 बसेस धावल्या असून, त्यातून 2899 प्रवाशांनी वाहतुक केल्याचे एसटी महामंडळ प्रशासनाने सांगितले आहे.

7400 कर्मचाऱ्यांनी कामावर हजर

प्रवर्ग - एकूण कर्मचारी - संपातील कर्मचारी संख्या

प्रशासकीय - 9426 - 5224 - 4202

कार्यशाळा - 17560 - 1773 - 15787

चालक - 37225 - 264 - 36961

वाहक - 28055 - 139 - 27916

एकूण - 92266 - 7400 - 84866

कारवाईची आकडेवारी

संवर्ग - कार्यरत संख्या - नोटीस देण्यात आलेल्यांची संख्या

चालक - 29 - 25

चालक तथा वाहक - 2188 - 2101

वाहक - 182 - 132

सहाय्यक - 97 - 22

लिपीक-टंकलेखक - 88 - 16

एकूण -2584 - 2296

loading image
go to top