एसटीची विना वातानुकूलित स्लीपर बस लवकरच सेवेत; स्वमालकीच्या ५० बसेस बांधण्याचं काम सुरु, काय आहेत वैशिष्ट्ये?

st bus
st busesakal

मुंबई : पुणे येथील दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेत विना वातानुकूलित स्लीपर रातराणी बसेसची बांधणी सुरू आहे. एकूण ५० बसेस बांधण्यात येणार असून, रात्री रातराणी म्हणून धावणाऱ्या साध्या बसच्या ठिकाणी या विना वातानुकूलित स्लीपर बसेस धावणार आहेत.

रात्री लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आरामदायक सेवा उपलब्ध होणार आहे. सध्या एक बस कार्यशाळेत तयार करण्यात आली असून दुसरी बस तयार करताच दोन बसेसचे मार्ग आणि तिकीट दर ठरवून प्रवाशांच्या सेवेत दाखल केली जाणार आहे.

या रातराणी बसला आकर्षक रंगसंगतीने रंगविण्यात आलेली आहे. १२ मीटर लांबीच्या टाटा चेसिसवर बस बांधण्यात आलेली असून बसची रुंदी २.६ मीटर व ऊंची ३.६ मीटर अशी आहे. गाडीला हवेचा अवरोध कमी होण्यासाठी एरोडायनेमिक आकार देण्यात आलेला असून पुढील व मागील शौ आकर्षक एफआरपीमध्ये तयार केलेला आहे.

st bus
Bhagvat Karad: छत्रपती संभाजीनगरमधून भागवत कराड लोकसभा लढवणार? केला मोठा दावा

चालक केबीनमध्ये अनाऊसिंग सिस्टीम बसविली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना सावध करण्यासाठी बल्कहैड पार्टीशनवर हूटर बसविण्यात आलेला असून त्याचे बटण चालक कक्षात देण्यात आलेले आहे. पाठीमागील बाजूस एक रिव्हसिंग कॅमेरा बसविलेला असून त्याची एलईडी स्क्रीन चालक कक्षात देण्यात आलेली आहे. चालकासमोरील बाजूस डोळ्यावर ऊन येऊ नये, यासाठी पडदा बसविण्यात आला आहे.

रातराणी बसमध्ये दोनास एक रचनेसह प्रवासी शयनकक्ष बांधण्यात आलेले आहेत. चालक बाजूस दुहेरी व वाहक बाजूस एकैरी अशा ५ ओळीत शयनरचना करण्यात आलेली असून एकूण ३० प्रवासी आरामशीर झोपून प्रवास करु शकतील अशी व्यवस्था केली आहे. खालच्या व वरच्या प्रत्येक बर्थसाठी पुढे मागे सरकती काच असलेली स्वतंत्र खिडकी देण्यात आलेली आहे.

तसेच बाहेरील उजेडाचा त्रास होऊ नये म्हणून प्रवासी खिडक्यांना आकर्षक रंगाचे पडदे बसविण्यात आलेले आहेत. प्रवाशांना झोपण्यासाठी गादी व उशी एकत्र असलेली सुविधा देण्यात आलेली असून आकर्षक रंगाचे रेक्झीन कापड वापरलेले आहे. प्रत्येक बर्थमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी सुविधा दिलेली असून मोबाईल ठेवण्यासाठी पाऊच दिलेला आहे. तसेच मॅगझीन पाऊच व पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी ब्रॅकेटची सुविधा दिलेली आहे. तसेच पर्स अडकविण्यासाठी हुक दिलेले आहे.

st bus
मणिपूरमधील दोन पीडित महिला पोहोचल्या सर्वोच्च न्यायालयात; केली महत्त्वपूर्ण मागणी...

अशाही आहेत सुविधा

- प्रत्येक बर्थमध्ये वाचनासाठी रिडींग टॅम्प व निळ्या रंगाचा नाईट लॅम्प

- वरच्या बर्थवर चढण्यासाठी मजबूत बांधणीची शिडी व धरण्यासाठी हँडल

- प्रवासी झोपल्यानंतर झोपेत खाली पडू नये यासाठी बर्थशेजारी योग्य प्रकारचे अडथळे

- दिव्यांग व्यक्तींसाठी १ क्रमांकाचे शयनकक्ष आरक्षीत असून, बेलची सुविधा दिली आहे.

- पीव्हीसी फ्लोरींग / शीट टाकली आहे.

- हवेच्या दाबावर उघडझाप होणारा जे. के. प्रकारचा प्रवासी दरवाजा बसविण्यात आलेला आहे.

प्रवासी सुरक्षेच्या सुविधा

- आपत्कालीन सुटकेसाठी गाडीच्या मागील बाजूस गँगवेच्या रेषेमध्ये आपत्कालीन दरवाजा सुविधा दिलेली आहे व बसच्या वरील बाजूस दोन एस्केप हॅच देण्यात आलेले आहेत. तसेच चालक कक्षामध्ये एक रुफ हॅच देण्यात आलेला आहे.

- आपत्कालीन काच फोडण्यासाठी गाडीमध्ये पुरेसे हातोडे योग्य ठिकाणी बसविलेले आहेत.

- गाडीला आग लागल्यास विझविण्यासाठी चार किलो व सहा किलोचे दोन अग्नीशामक उपकरणे दिलेली आहेत व इंजिनसाठी एफडीएसएस अग्नीशामक यंत्रणा बसविण्यात आली आहे.

पुण्यातील दापोडी येथील एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेत ५० विना वातानुकूलित शयनयान बसेसची बांधणी सुरू आहे. त्यापैकी एक बस बांधून पूर्ण झाली आहे. लवकरच या बसचा तिकीट दर व मार्ग निश्चित केले जातील. पुढील काही दिवसांत ही बस प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल.

- अभिजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com