परबांच्या शासकीय निवासस्थानावर फेकली काळी शाई, ४ जण ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Parab

परबांच्या शासकीय निवासस्थानावर फेकली काळी शाई, ४ जण ताब्यात

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Strike) संप चिघळला असून आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या शासकीय निवासस्थानावर काळी शाई फेकण्यात आली. जनशक्ती संघटनेच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी शाई फेकली असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला 'ब्रेक'! संपामुळे 315 कोटींचा फटका

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करावे, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, सरकार विलनीकरणासाठी तयार नाही. विलनीकरणाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. तरीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबन कऱण्यात आले. तसेच काहींची सेवा समाप्ती करण्यात आली. मात्र, एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांवर ठाम आहे. अनिल परब यांची सोमवारीच शरद पवारांसोबत बैठक झाली. यावेळी तरी संपावर तोडगा निघण्याची आशा होती. मात्र, बैठकीत काय चर्चा झाली यावर ना पवारांनी भाष्य केले ना परबांनी. तसेच न्यायालयाचा निर्णय आल्याशिवाय आम्ही काहीही करणार नाही, अशी भूमिका अनिल परब यांनी स्पष्ट केली. त्यामुळे एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

आज एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरूनच जनशक्ती संघटनेच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानावर काळी शाई फेकली. त्यांच्या निवासस्थानी गोंधळ देखील घातला. त्यानंतर या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

loading image
go to top