ST संप: तोडग्याबाबत सकारात्मक चर्चा; अनिल परबांनी घेतली शरद पवारांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST संप: तोडग्याबाबत सकारात्मक चर्चा; अनिल परबांनी घेतली शरद पवारांची भेट

ST संप: तोडग्याबाबत सकारात्मक चर्चा; अनिल परबांनी घेतली शरद पवारांची भेट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. तब्बल तीन तास ही बैठक चालली. या बैठकीमध्ये परब यांची एसटी संपासंदर्भात शरद पवारांशी चर्चा झाली. ही बैठक झाल्यानंतर बोलताना अनिल परब यांनी म्हटलंय की, संपामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. त्यामुळे या संपावर काय तोडगा काढता येईल, यासंदर्भात शरद पवारांशी आणि अधिकाऱ्यांशी तीन तास बैठक चालली.

अनिल परब म्हणाले की, गेले काही दिवस एसटीचा संप सुरु आहे त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यासंदर्भातच शरद पवारांनी मला आणि अधिकाऱ्यांना बोलावलं होतं. त्यांनी सगळी परिस्थिती समजून घेतली. या संपावर काय तोडगा निघू शकतो, याबाबत त्यांनी तपासणी केली. संप मिटवण्यासाठी महामंडळाची आर्थिक परिस्थिती आणि संपकरी कामगारांच्या मागण्या यासंदर्भात त्यांनी सविस्तर चर्चा केली. सखोल चर्चा झाली आणि वेगवेगळे पर्याय कशापद्धतीने तयार करता येतील आणि मार्ग काढता येईल, यावर चर्चा झाली.

हेही वाचा: देशमुख आणि सिंह यांच्यातील वादावर 'SC' ने व्यक्त केली चिंता

विलीनीकरणावर काय झाली चर्चा? विलीनीकरणाचा मुद्दा हायकोर्टाने नेमलेल्या समीतीसमोर आहे. त्या समितीसमोर सरकारने आपली काय बाजू मांडावी, याबाबत देखील चर्चा झाली. मात्र, विलीनीकरणाबाबतचा अहवाल आम्ही स्विकारु, मात्र, हा अहवाल हायकोर्टाने नेमलेल्या समितीकडून येईल. कामगारांचे दुसरे प्रश्न काय आहेत, वेतनवाढीबाबत काय करता येईल, एसटीचं उत्पन्न कसे वाढवता येईल, याबाबत आम्ही सविस्तर अभ्यास आम्ही केला आहे. प्रश्न सोडवण्यासंदर्भातच ही सकारात्मक चर्चा झाली आहे. कुठलाही मुद्दा ठोसपणे सांगता येणार नाही. ही चर्चा अंतर्गत चर्चा झाली. व्यवस्थित स्वरुप आल्यानंतर चर्चेतले मुद्दे सांगता येतील. कामगारांच्या वेतन वाढीसंदर्भात चर्चा झाली. हायकोर्टाने नेमलेल्या समितीसमोर काय मुद्दे मांडायचे, यासंदर्भात चर्चा झाली.

loading image
go to top