एसटी संप सुरुच राहणार; विलीनीकरणाच्या मागणीवर संपकरी ठाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी संप सुरुच राहणार; विलीनीकरणाच्या मागणीवर संपकरी ठाम

एसटी संप सुरुच राहणार; विलीनीकरणाच्या मागणीवर संपकरी ठाम

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर यांनी माघार घेतली असली तरी हे आंदोलन सुरुच राहणार आहे, अशी घोषणा कामगारांनी केली आहे. हा लढा न्यायालयात लढणारे गुणरत्न सदावर्ते यांनी बोलताना म्हटलंय की, कामगाराच्या चाळीस आत्महत्त्या या आत्महत्त्या नसून या इन्स्टिट्यूशनल मर्डर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे शरद पवार आणि वळसे पाटलांचं अपयश आहे, असंही ते म्हणाले. आझाद मैदानातील आंदोलन मागे घेतलं गेलं असलं तरीही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे त्यांनी हा संप सुरुच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

हेही वाचा: 'आझाद मैदानातील आंदोलन मागे; राज्यातील संपाचं काय करायचं ते कामगारांनी ठरवावं'

काय म्हणाले पडळकर-खोत?

हे आंदोलन कामगारांनी उभं केलं आहे, त्यामुळे त्याबाबतचा निर्णय आता त्यांनीच घ्यावा. आज यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन आहे. या दिवशी कामगारांनी निर्णय घ्यावा. आझाद मैदानावरचं आंदोलन तात्पुरतं मागे घेत आहोत. बाकी राज्यभरातलं आंदोलन मागे घ्यायचं की तसंच ठेवायचं, याचा निर्णय कामगारांनी घ्यावा, असं वक्तव्य आज पत्रकार परिषदेत सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. आंदोलन चालू ठेवलं तर त्यांना पाठिंबा राहिलच, मात्र तो निर्णय त्यांनीच घ्यावा, असं मत सदाभाऊ खोत यांनी मांडलंय.

loading image
go to top