Coronavirus : कोरोना संसर्गाचे टप्पे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

विविध देशांतील कोरोना संसर्गाची स्थिती वर्णन करताना, ‘या देशात कोरोना या टप्प्यावर (स्टेज) आहे,’ असे आपण ऐकतो किंवा वाचतो. पण हे टप्पे ठरविण्याचे नेमके निकष कोणते आणि ते कसे ठरवले जातात, तसेच त्याबद्दल काय काळजी घ्यावी याबद्दल आपण जाणून घेऊ.

विविध देशांतील कोरोना संसर्गाची स्थिती वर्णन करताना, ‘या देशात कोरोना या टप्प्यावर (स्टेज) आहे,’ असे आपण ऐकतो किंवा वाचतो. पण हे टप्पे ठरविण्याचे नेमके निकष कोणते आणि ते कसे ठरवले जातात, तसेच त्याबद्दल काय काळजी घ्यावी याबद्दल आपण जाणून घेऊ. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पहिला टप्पा 
परदेशातून कोरोनाबाधित व्यक्ती देशात येणे  
विमानतळावरच परदेशी प्रवाशांची तपासणी करणे आणि बाधित व्यक्तीचे विलगीकरण करून त्यावर उपचार सुरू करणे. 

दुसरा टप्पा 
बाधित व्यक्तीकडून स्थानिक व्यक्तीला संसर्ग 
(सध्या भारत या टप्प्यात)
 तातडीने बाधित व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे किंवा समूहाची तपासणी करणे. नागरिकांनी स्वयंशिस्तीने स्वतःचे विलगीकरण करणे. सार्वजनिक ठिकाणे, मालमत्ता यांचे निर्जंतुकीकरण करणे. 

तिसरा टप्पा 
स्थानिक बाधित व्यक्तीकडून समूहात विषाणूचा फैलाव 
गंभीर असलेल्या या टप्प्यात शहरांत पूर्णतः संचारबंदी लागू करणे. फक्त जीवनावश्‍यक सुविधांसाठी नागरिकांना ढील देणे. मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे अशा वैद्यकीय सूचनांचे काटेकोर पालन करणे. 

चौथा टप्पा
बाधित समूहाकडून पूर्ण प्रदेशात उद्रेक
सर्वाधिक गंभीर असलेल्या या टप्प्यात संपूर्ण देश ‘होम क्‍वारंटाइन’मध्ये जातो. परदेशातून एकाही व्यक्तीला देशात येण्यास बंदी करणे. यावर पूर्ण उपाययोजना काय असाव्यात याबद्दल अजूनही संशोधन चालू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stages of Corona infection