राज्य वाङ्‌मय पुरस्कार कोणाकोणाला मिळाले पहा

Award
Award

‘सकाळ’च्या ‘संवाद बळिराजाशी’ पुस्तकाचाही गौरव
मुंबई - उत्कृष्ट मराठी वाङ्‌मयनिर्मितीसाठी मराठी भाषा विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या २०१८ साठीच्या राज्य वाङ्‌मय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर, अजित दळवी, प्रभा गणोरकर, जयराज साळगावकर, मंगला गोडबोले, रवींद्र लाखे, प्राजक्त देशमुख यांच्यासह ३५ साहित्यिकांच्या वाङ्‌मय कलाकृतींचा सन्मान केला जाणार आहे. विशेष म्हणजे, यामध्ये ‘सकाळ प्रकाशन’च्या प्रा. डॉ. द. ता. भोसलेलिखित ‘संवाद बळिराजाशी’ या पुस्तकास वसंतराव नाईक पुरस्कार जाहीर झाला आहे.

इतर पुरस्कारविजेते - रवींद्र दामोदर लाखे (अवस्थांतराच्या कविता), राही डहाके (रक्तवर्णी सूर्य), अजित दळवी (समाजस्वास्थ्य), प्राजक्त देशमुख (देवबाभळी), किरण गुरव (जुगाड), संग्राम गायकवाड  (आटपाट देशातल्या गोष्टी), विलास सिंदगीकर (बाजार), दिनकर कुटे (कायधूळ), विनया जंगले (मुक्‍या वेदना, बोलक्‍या संवेदना), नीलिमा क्षत्रिय (दिवस आलापल्लीचे), ज्युनिअर ब्रह्मे (रूपेश कुडुचकर) (ब्रह्मे घोटाळा), सुनीता तांबे व सागर रेड्डी (नाम तो सुना होगा), गो. तु. पाटील (ओल अंतरीची...), डॉ. पराग घोंगे (अभिनय चिंतन ः भरतमुनी ते बर्टोल्ट ब्रेख्त), दा. गो. काळे (आकळ), मंगला गोडबोले (सती ते सरोगसी), नरेंद्र चपळगावकर (त्यांना समजून घेताना), डॉ. श्‍यामकांत मोरे (मालवणी बोली शब्दकोश), डॉ. पुष्पा खरे व डॉ. अजित केंभावी (गुरुत्वीय तरंग), प्रा. डॉ. द. ता. भोसले (संवाद बळिराजाशी), प्रा. रूपाली अवचरे (वामन निंबाळकरांची कविता : स्वरूप आणि आकलन), जयराज साळगावकर (बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी), डॉ. सतीश पावडे (द थिएटर ऑफ द ॲब्सडर्स), डॉ. पुरुषोत्तम भापकर (शैक्षणिक षटकार), डॉ. संदीप श्रोत्री (कासवांचे बेट), आशा बगे (निवडक कथा ः संपादक - प्रभा गणोरकर), मेघा पानसरे (सोव्हिएत रशियन कथा), संजय झेंडे (पाणीदार माणसं), गणेश घुले (सुंदर माझी शाळा), डॉ. व्यंकटेश जंबगी (बालमंच : बाल एकांकिका संग्रह कविता), डॉ. सुमन नवलकर (काटेरी मुकुट), मृणालिनी वनारसे (प्रश्नांचा दिवस), आनंद घैसास (ताऱ्यांचा जन्म-मृत्यू), आशा केतकर (थोर संशोधक), द. तु. पाटील (चैत).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com