Mahavitaran Strike : राज्यातील वीज कर्मचारी तीन दिवस संपावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavitaran Strike

Mahavitaran Strike : राज्यातील वीज कर्मचारी तीन दिवस संपावर

महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर आहेत. खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे शेतकरी व सामन्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या जवळपास 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे. 4,5 व 6 जानेवारी असा तीन दिवस हा संप असणार आहे.

गरज पडल्यास हा राज्यव्यापी संप तीन दिवसांनंतरही सुरु ठेऊन अशी भूमिका महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्याचबरोबर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: PIFF Mahotsav : पुण्यात २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान रंगणार ‘पिफ’

राज्यातील जनतेने कुठेही भयभीत होण्याची आवश्यकता नाही. वीज कर्मचारी त्यांच्या संपाविषयीची भूमिका बदलतील याची खात्री आहे. अन्यथा पर्यायी व्यवस्था झाली असल्याने विद्युत पुरवठा अखंडित राहील याची खात्री बाळगावी. अशी माहिती महावितरणचे संचालक विश्वास पाठक यांनी दिली आहे. तर संप करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर मेस्मांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा: Pimpri News : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अंत्यविधीत चंद्रकांत पाटील यांना हुंदका फुटला

टॅग्स :mahavitaranStrike