मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत राज्य शासनाची भूमिका नकारात्मक- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट दिली. रुग्णांशी संवाद साधला, त्यानंतर पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर सर्वत्र दिल्याने त्याची पाहणी केली.
देवेंद्र फडणवीस, हिंगोली
देवेंद्र फडणवीस, हिंगोली

हिंगोली : पहिल्या व दुसऱ्या टप्यातील कोरोनाची लाट ओसरत असताना आता तिसऱ्या लाटेची श्यक्यता आहे. त्यामुळे ही लाट थोपवण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाला तिसऱ्या लाटेपासून बचाव कसा करायचा याची तयारी करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. तीन) हिंगोलीत आयोजित पत्रकार परिषदेत केले.

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी हिंगोली जिल्हा दोऱ्यावर आले असता येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी पत्रकार परिषद श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव, माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा - महावितरणचे अध्यक्ष विजय सिंघल यांनी विशेष लक्ष देऊन सातत्याने आढावा घेत योजनेला गती दिल्याने राज्यातील तब्बल एक कोटी १५ लाख शहरी वीजग्राहकांचा वीजपुरवठा दर्जेदार झाला.

देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट दिली. रुग्णांशी संवाद साधला, त्यानंतर पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर सर्वत्र दिल्याने त्याची पाहणी केली. याबाबत व्हेंटिलेटर काही ठिकाणी बाद झाले असल्याचे सांगून व्हेंटिलेटर नीट काम करीत आहे किंवा नाही याची पाहणी केली. खरेच नादुरुस्त असतील त्याची तांत्रिक लोकांकडून तपासणी करावी लागेल. कोविड सेंटरमधील व्हेंटिलेटर नादुरुस्त नसल्याचे सांगून एकप्रकारे त्यांनी केंद्रसरकरची पाठराखण केली आहे. त्यानंतर पुढे बोलताना ते म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव राज्याच्या तुलनेत बरा आहे. डेथ रेट देखील राज्याच्या तुलनेत कमी असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी खूप मेहनत घेण्याचे सांगून त्यांचे कौतुक केले.

आता राज्यात येणारी तिसरी लाट ही भयंकर असून त्याची तयारी करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगून राज्यसरकारने देखील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. म्युकरमायकोसिसमुळे आतापर्यन्त कोणीही मृत्युमुखी पडला नाही. म्युकरमायकोसिसची इंजेक्शन महाग आहेत. किमान सहा ते सात इंजेक्शन लागत आहेत तर रुग्ण बरे होण्यासाठी पंधरा दिवस लागतात असे ते म्हणाले. राज्यात म्युकर मायकोसिसच्या केसेस पाच हजाराच्या घरात असून आणखी वाढतील असा अंदाज वर्तविला आहे. त्यासाठी सरकारने प्रयत्न करुन या रुग्णांना महात्मा फुले योजनेतून मोफत लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून सरकारी असो की खाजगी रुग्णालयात भरती असलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना मोफत इंजेक्शन दिले पाहिजे.

येथे क्लिक करा - आघाडी सरकारच्या नावाखाली पवारांनी ‘येडं पेरलं अन खुळं उगवलं’ - पडळकर -

म्युकरमायकोसिसचे लक्षणे दिसल्यास त्या रुग्णांची स्क्रिनिंग केली पाहिजे असे सांगून उशिराने रुग्ण आला तर डोळा गमावण्याची वेळ येते. मात्र आजपर्यंत म्युकरमायकोसिसचा मृत्यू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यसरकारने रुग्णांची गरज ओळखून गरीब रुग्णांना दिलासा दिला पाहिजे असे यावेळी देवेन्द्र फडणवीस यांनी सांगितले. पत्रकार परिषदेपूर्वी फडणवीस यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स दर्जा देण्याची गरज असून राज्य सरकारने या पत्रकारांना मागणीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. त्यानंतर मराठा ओबीसी अरक्षणाबाबत राज्य शासनाची भूमिका नकारात्मक राहिल्याने ओबीसींचे आरक्षण कमी झाले असा आरोप केला.

खरीप हंगाम येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शेतकऱ्यांना बी बियाणे, खाते खरेदीसाठी बँकांनी कर्ज वाटप करणे आवश्यक असताना जिल्ह्यात कर्ज वाटप खूप कमी प्रमाणात आहे. तर जिल्हा बँकांची परिस्थिती देखील चांगली नाही, कर्ज वाटप का नाही झाले याचे योग्य पद्धतीने मोनिटरिंग करण्यात आले नसल्याचे सांगून, विमा कंपन्यां ह्या कोण्या सरकारच्या मालकीच्या नसून त्या खाजगी आहेत असा सवाल करीत पीक विमा कंपन्यांचे नियोजन करुन एजन्सी देणे सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com