
मुंबई : राज्य भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनीही राजकीय संघटना प्रमाणे सरकार विरोधात भूमिका घेत राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये पहिलीपासून सुरू होणाऱ्या हिंदी विषयाला विरोध करणारी भूमिका जाहीर केली आहे. यासाठी आज भाषा सल्लागार समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन जारी केले असून त्यामध्ये त्यांनी सरकारच्या धोरणावरच आक्षेप नोंदवल्याने याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.