केंद्राला राज्य सरकारचा दणका; वाहन कायद्याला फाटा!

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

नव्या मोटार वाहन कायद्याला राज्यात कोलदांडा..! 
नव्या दंडाच्या वसुलीला परिवहन मंत्र्यांची स्थगिती 

मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला महाराष्ट्रात तुर्तास तरी कोलदांडा बसला असून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्थगिती दिली आहे. यामुळे राज्यात नव्या कायद्यानुसार वाहन नियम तोडल्यास घोषित दंडाच्या रक्कमेचा भुर्दंड वाहनचालक अथवा मालकास भरावा लागणार नाही. 

जोपर्यंत राज्य परिवहन विभाग या नवीन कायद्याच्या अंमलबजावणीचे परिपत्रक काढणार नाही तो पर्यंत नव्या कायद्यातील दंडाच्या रकमा वसुल केल्या जाणार नाहीत असे रावते यांनी स्पष्ट केले. 

केंद्र सरकारच्या कायद्यानुसार वाहनांचे नियम तोडल्याल जबरी रकमेची दंड आकारणी करण्यात आली आहे. मात्र या तरतूदींना देशभरातून विरोध होत आहे. नागरिकां मधे प्रचंड संतापाची लाट आहे. त्यामुळे नागरिकांच्या भावना लक्षात घेता या कायद्यातील दंडाच्या रकमेचा फेरविचार करण्याची गरज असल्याचे पत्र दिवाकर रावते यांनी केद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पाठवले आहे. 
केंद्राच्या उत्तराची प्रतिक्षा करूयात असे स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state Minister Diwakar Raote denies new Motor Vehicles Act in state