"आपलं भविष्य घडवण्यात एसटीचा वाटा"; मुख्यमंत्र्यांनी जागवल्या आठवणी

राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक व्यवस्था अर्थात एसटी अमृतमहोत्सव साजरा करत असून यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray

पुणे : राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक व्यवस्था अर्थात एसटीला आज ७५ वर्षे पूर्ण होत असून अमृत महोत्सव साजरा होत आहे. यावेळी एसटीनं नवं पाऊल टाकलं असून इलेक्ट्रिक बसचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. ऑनलाईन पार पडलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी एसटीचा इतिहास जागवला आणि आठवणींना उजाळा दिला. आपलं भविष्य घडवण्यात एसटीचा वाटा असल्याचंही ते यावेळी म्हणाले. (State transport of Maharashtra role in shaping our future Memories evoked by CM Thackeray)

मुख्यमंत्री म्हणाले, आमच्या आजोबांच्या काळात प्रवासासाठी वाहनं नव्हती. त्यावेळी बैलगाडीतून प्रवास व्हायचा. तिथंपासून आत्तापर्यंतचा प्रवास हा खूपच मजेशीर आहे. सर्व जणांना स्वतःची वाहन घेऊन प्रवास करणं परवडत नाही, अनेकदा त्याची गरजही नसते अशा वेळेला सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात त्यांनी वेळेत घेऊन जाणं हे फार मोठ काम गेली ७५ वर्षे एसटी करत आहे. त्यामुळं एसटीला मी शुभेच्छा देणारच आहे. पण तत्पूर्वी एसटी संदर्भातील जी फिल्म दाखवली त्यामध्ये एका शाळकरी मुलीनं शुभेच्छा दिल्या आहेत. म्हणजेच आपलं भविष्य घडवण्यामध्येही एसटीचा वाटा आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, पंढरीच्या वारीत एसटीचा मोठा वाटा आहे. त्यामुळं एसटी वारकऱ्यांचे आशीर्वादही घेत आहे, संस्कृती जपत आहे, आपल्या मुलांचं आणि एकूणच राज्याचं भविष्यही जपत आहात. किती मोठी काम एसटी करत आहे.

कोरोनाच्या काळात एसटीच्या बहादुर कर्मचाऱ्यांनी मोठा पराक्रम केला आहे. त्याच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही. समोर सर्व धोके दिसत असताना काम करणं हे मोठं काम आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षणाला, दिवसाला आणि प्रत्येक क्षेत्रात एसटीचं मोठ योगदान आहे.

आज मी जो काही आहे हे सांगणारे अनेक जण भेटतील. एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही आमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून पाहतो. अनेकदा एसटी घाट्यात असते कारण आपण सर्वसामान्यांच्या वाहतुकीची व्यवस्था करत असताना जर त्याचे दर इतर खासगी बसच्या बरोबरीनं ठेवणार असू तर एसटी चालवून उपयोग काय? त्यामुळं आपल्याला तोटा सहन करणं सहाजिकच आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी जे जे शक्य आहे ते आम्ही करत आहोत.

आता रस्ते सुधरताहेत, एसटी सुधारतेय आपल्याला पर्यावरण पूरक अशी वाहनं म्हणजेच इलेक्ट्रिक वाहनं सुरु होत आहेत. सर्वात जास्त इलेक्ट्रिक बस असणार मुंबई हे पहिलं शहर ठरणार आहे, याचा मला अभिमान आहे. हळू हळू आता आपण एसटीची सेवा पूर्णपणे प्रदुषणविरहित कशी होईल याकडे आपण लक्ष देणार आहोत. एसटीत सुधारणा करण्यासाठी नवनवीन संकल्पना आपण आणत आहोत, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com