
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी १९८५ पासून सुरू असलेली राज्यव्यापी ‘सकाळ एनआयई चित्रकला स्पर्धा’ यंदा २ फेब्रुवारीला (रविवारी) होणार आहे. एकाच दिवशी, एकाच वेळी महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांत आयोजित केली जाणारी सर्वांत मोठी स्पर्धा म्हणून सकाळ एनआयई चित्रकला स्पर्धेची सर्वत्र ख्याती आहे. गेली ३९ वर्षे सातत्याने ही स्पर्धा होत असून, यंदा स्पर्धेचे ४० वे वर्ष आहे. कोरोना काळातसुद्धा ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात झाली.