Vidhan Sabha 2019 : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर दगडफेक 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 October 2019

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या समर्थनगर येथील घरावर दगडफेक झाल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्रीनंतर घडला. यावेळी त्यांच्या चारचाकी गाड्या देखील फाेडण्यात आल्या. 

औरंगाबाद : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या समर्थनगर येथील घरावर दगडफेक झाल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्रीनंतर घडला. यावेळी त्यांच्या चारचाकी गाड्या देखील फाेडण्यात आल्या. राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले. 

हर्षवर्धन जाधव यांचा समर्थनगर येथे बंगला आहे. या बंगल्यासमोर दुचाकीवरून तीन जण आले. त्यांनी जाधव यांच्या वाहनावर तसेच बंगल्याच्या दिशेने दगड भिरकावले. यात जाधव यांच्या वाहनांच्या काचा फुटल्या तसेच घरांचेही नुकसान झाले आहे. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी क्रांतिचौक पोलिस पोचले. त्यांनी बंगला व वाहनांची पाहणी केली. तसेच सीसीटीव्ही तपासले असता एका दुचाकीवर तीन जण बसून बंगल्यासमोरून जाताना दिसले. असे पोलिस निरीक्षक उत्तम मुळक यांनी सांगितले. 

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा निवडणूक लढविली.  खैरेंना पडण्याचा त्यांनी निश्चय केला होता. त्यानंतर खैरेना थोड्या फरकाने हार पत्करावी लागली. त्यानंतर काल जाधव यांनी माजी आमदार अब्दुल सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशावरुन आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर जाधव यांच्या बंगल्यावर व वाहनावर  दगडफेक झाली. त्यामुळे हा राजकीय वादातून प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stoning of a vehicle with the house of former MLA Harshvardhan Jadhav