Trimbakeshwar Temple : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराची कहाणी, औरंगजेबाच्या हल्ल्यानंतर ते कधी आणि कोणी बांधले

त्र्यंबकेश्वर मंदिराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत
Trimbakeshwar Temple
Trimbakeshwar Temple esakal

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. या व्हिडिओमध्ये मुस्लिम समाजातील काही लोक मंदिराच्या आत हिरवी चादर चढवण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. मात्र, पुजारी आणि सुरक्षा रक्षकांनी पूर्ण तत्परतेने त्या लोकांना मंदिरात जाण्यापासून रोखले. यादरम्यान दोन्ही पक्षांमध्ये जोरदार वादावादी झाली.

Trimbakeshwar Temple
Pickle Making Tips : लोणचे बनवण्यासाठी कोणते तेल वापरावे म्हणजे लोणचे टिकेल?

ही घटना 13 मेची असल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यासोबतच या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून होणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही काही समाजातील लोकांनी या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.

Trimbakeshwar Temple
Parenting Tips : पालकांच्या या सवयींचा मुलांवर पडतो वाईट प्रभाव

काय आहे त्र्यंबकेश्वर मंदिराचं महत्व

हे महादेव मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराची गणना हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांमध्ये केली जाते. हे शिवभक्तांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. हे पौराणिक मंदिर महाराष्ट्रातील नाशिक विमानतळापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. या गावाचे नाव त्र्यंबक. येथेच गंगा नदी गोदावरीच्या रूपाने पृथ्वीवर आल्याची कथाही सांगितली आहे. येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिगुणांचा अवतार असल्याचे म्हटले जाते.

Trimbakeshwar Temple
Travel Story : हनिमूनसाठी भारतातील स्वस्तात मस्त ठिकाणे

नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिर कधी बांधले गेले?

मुघलांच्या हल्ल्यानंतर पेशव्यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे केला. बालाजी म्हणजेच श्रीमंत नानासाहेब पेशवे, जे तिसरे पेशवे म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांनी 1755 ते 1786 दरम्यान या मंदिरांची पुनर्रचना केली.

Trimbakeshwar Temple
Cars Under 10 Lakh: कार घेण्याचा विचार करताय?पाहा स्वस्त अन् मस्त पर्याय

असं म्हटलं जातं की सोने आणि मौल्यवान दगडांनी बनवलेला लिंगावरील मुकुट पांडवांनी दान केला होता.सतराव्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असताना या कामासाठी 16 लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले जाते. त्र्यंबक ही गौतम ऋषींची तपोभूमी म्हणूनही ओळखले जाते.

Trimbakeshwar Temple
Maruti Suzuki : या महिन्याच्या अखेरीस लॉन्च होणार मारुतीची जिमनी

हे मंदिर स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे

त्र्यंबकेश्वर मंदिर काळ्या दगडांवरील कोरीव काम आणि त्याची भव्यता यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. संपूर्ण मंदिर काळ्या दगडांनी बनलेले आहे. चौकोनी मंडप आणि मोठे दरवाजे हे मंदिराचे वैभव आहे. मंदिराच्या आत एक सोन्याचा कलश आहे आणि शिवलिंगाजवळ हिरे आणि इतर मौल्यवान रत्नांनी जडलेले मुकुट ठेवलेले आहेत. या सर्वांचे पौराणिक महत्त्व आहे.

Trimbakeshwar Temple
Maruti Suzuki 7 Seater Car : जुलै मध्ये येईल मारुती सुझुकीची नवीन 7 सीटर कार

औरंगजेबाने त्र्यंबकेश्वर मंदिरावर हल्ला केला

मुघल काळातील राज्यकर्त्यांनी भारतातील अनेक शहरांतील हिंदू देवतांची देवस्थाने नष्ट केली होती, त्यापैकी एक नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर होते. इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी त्यांच्या 'हिस्ट्री ऑफ औरंगजेब' या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे.

Trimbakeshwar Temple
Maruti cars May 2023 Discount : मारुतीच्या या 8 गाड्यांवर मिळते आहे बंपर सूट, त्वरा करा

त्यांनी लिहिले आहे की, 1690 मध्ये मुघल शासक औरंगजेबाच्या सैन्याने नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिवलिंग तोडले. मंदिराचेही मोठे नुकसान झाले. आणि त्यावर मशिदीचा घुमट बनवला होता. औरंगजेबानेही नाशिकचे नावही बदलले होते. पण 1751 मध्ये मराठ्यांनी पुन्हा नाशिक काबीज केले, त्यानंतर हे मंदिर पुन्हा बांधण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com