"महाविकास'ची अजब तऱ्हा...महाराष्ट्रात दोस्ती, सोलापुरात कुस्ती 

mahavikas aaghadi
mahavikas aaghadi
Updated on

सोलापूर : शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे कधी नव्हे ते एकत्रित आले आणि महाराष्ट्रात राजकीय चमत्कार घडविला. मुख्यमंत्रीपदापासून भाजपला दूर ठेवण्यासाठी या तिन्ही पक्षांनी आयत्यावेळी दोस्ती केली. जिल्हा पातळीवर मात्र आजही खरा संघर्ष शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस विरुद्ध शिवसेना असाच बघायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात या तिन्ही पक्षांची दोस्ती असली तरीही सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मात्र या तिन्ही पक्षांची कुस्ती बघायला मिळत आहे. 

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून सोलापूरचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आहे. भरणे यांचे पहिलेच पालकमंत्रीपद आणि त्याच सोलापूरसाठी राजकीयदृष्ट्या किचकट असलेला जिल्हा त्यांना मिळाल्याने राष्ट्रवादीतील गटबाजी आवरता आवरता पालकमंत्री भरणे यांना आता कॉंग्रेस आणि शिवसेनेचीही डोकेदुखी सहन करावी लागत आहे.

पालकमंत्री आमच्याकडे बघत नाहीत, राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमचे प्रश्‍न सुटत नसल्याच्या तक्रारी सोलापूरच्या शिवसैनिकांनी केल्यानंतर मातोश्रीवरुन त्याची दखल घेण्यात आली. शिवसेनेने सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्या विधानसभा मतदार संघासाठी आमदार सुनील प्रभू यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी तर आमदार प्रणिती शिंदे यांना थेट सोलापूरचे पालकमंत्रीच करण्याची मागणी त्यांचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात राष्टवादी, शिवसेना आणि कॉंग्रेसचा सूर अद्यापही जुळालेला नसल्याचे समोर आले आहे. येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका व महापालिकेच्या निवडणुका आहेत या निवडणुकांपूर्वी हे चित्र स्पष्ट झाल्यास आणि राज्यातील दोस्ती सोलापुरातही झाल्यास महाविकास आघाडीला त्याचा अधिक लाभ होईल. 

महापालिकेत कॉंग्रेसला नाही सेनेवर भरवसा 
महापालिकेत भाजपकडे एकहाती काठावरचे संख्याबळ आहे. राज्यात महाविकासचा प्रयोग झाल्यानंतर महापालिकेत एमआयएमच्या मदतीने अस्साच प्रयोग होऊ शकतो याची सुरवातीला कॉंग्रेस नेत्यांना कल्पना आली होती. या प्रयोगातून शिवसेना व विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनाच अधिकचा लाभ होत असल्याची खात्री कॉंग्रेस व एमआयएमची झाल्याने त्यांनी महापालिकेत या प्रयोगाचा फक्त विचारच केला, प्रत्यक्षात कृती मात्र काहीच केली नाही. महापालिकेतील शिवसेनेला आजही राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसपेक्षा भाजप जवळची वाटत असल्याचे वारंवार समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

शेतकऱ्यांना ३६००० कोटींची कर्जमाफी! mantralay
solapur excise department action
Amravati-Pune Express Among Delayed Trains
Maharashtra ST Buses to Become 100% Electric by 2047
Marathi News Esakal
www.esakal.com