esakal | कडक निर्बंध : सकाळी ७ ते ११ या वेळेतच राहणार दुकानं सुरु; आजपासून नवी नियमावली लागू

बोलून बातमी शोधा

coronavirus Pune city lockdown time for shops may updated
कडक निर्बंध : सकाळी ७ ते ११ या वेळेतच राहणार दुकानं सुरु; आजपासून नवी नियमावली लागू
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई

राज्यात सध्या १ मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात केवळ अत्यावश्यक वस्तू आणि सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आता संचारबंदीचे नियम अधिक कडक करण्यात आले असून नागरिकांना जास्त वेळ घराबाहेर राहू नये म्हणून अत्यावश्यक वस्तू व सेवांची दुकानं सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच खुली ठेवण्यात येणार आहेत. आज (२० एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत ती कायम राहणार आहे. राज्य शासनानं या नियमावलींचं अधिकृत पत्राक जाहीर केलं आहे. यानुसार, कुठली दुकानं मर्यादीत काळात सुरु राहतील आणि कुठल्या सेवा दिवसभर सुरु राहतील याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत काय खुलं राहणार?

किराणा दुकानं, भाजीपाला विक्री केंद्र, फळ विक्री केंद्र, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची दुकानं, बेकरी, सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकानं (यामध्ये चिकन, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी यांचा समावेश), कृषी संबंधीच्या सेवा आणि शेतमालाची दुकानं, पाळीव प्राण्यांच्या खाद्यांची दुकानं, पावसाळ्यासंबंधी वस्तूंची दुकानं आणि संस्था या सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत खुली राहतील.

सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु असणाऱ्या सेवा

सध्याच्या संचारबंदीच्या काळात यापूर्वी काढलेल्या शासन आदेशानुसार ज्या घरपोच सेवांना परवानगी देण्यात आली आहे. त्याच सेवा आता नव्या आदेशानुसार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. स्थानिक प्रशासनाला गरजेनुसार यामध्ये बदल करण्याचे अधिकार असतील, असंही नव्या आदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, बाकी इतर सर्व सेवा व वस्तूंची दुकानं पूर्णतः बंद राहणार आहेत.