
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची गृहमंत्रालयाकडून चौकशी होणार
मुंबई : दहावी आणि बारावीच्या (10th and 12th Board exams) ऑफलाईन परीक्षां घेण्यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत. तसेच विद्यार्थी (Student Protest In Maharashtra) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. तेथील गर्दी नियंत्रणात आणण्याचे देखील आदेश वळसे पाटील यांनी दिले आहेत. (State Home Minister Dilip Walse Patil On Student Protest )
हेही वाचा: लसीचे दोन डोस घेणाऱ्यांनाचा मिळणार महाविद्यालयात प्रवेश : उदय सामंत
राज्यात अनेक ठिकाणी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन ( Protest For Online Exam) घ्याव्यात या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे विकास पाठक उर्फ 'हिंदुस्थानी भाऊ' (Hindustani Bhau)चे नाव अनेक आंदोलक विद्यार्थांकडून घेण्यात आले आहे.(Hindustani Bhau News) त्यामुळे या आंदोलनामागे असणाऱ्या हिंदुस्थानी भाऊचा पोलिसांकडून शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून, विद्यार्थांची डोकी भडकवणाऱ्या हिंदुस्थानी भाऊला अटक होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Will Hindustani Bhau Be Arrested)
हेही वाचा: Bachhu Kadu on Students Protest | विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले बच्चू कडू ; पाहा व्हिडीओ
या घटनेवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असतील तर त्यांनी चर्चा करावी, आंदोलन हे शवेटचं पाऊल असतं असं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी शिक्षण मंत्र्यांच्या धारावी येथील घराबाहेर मोठी गर्दी केली होती. "एकतर चर्चेतून प्रश्न सुटतात पण अशा प्रकारे विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून एखाद्या गोष्टीला हिंसक वळण देणं किंवा विद्यार्थ्यांना अशा प्रकारे प्रेरित करणं हे चुकीचं आहे.
आंदोलन करणारी ही मुलं अठरा वर्षांखालील अल्पवयीन आहेत. त्यामुळं त्यांना भडकवताना प्रत्येकानं या गोष्टींचा विचार करावा. मी शिक्षणतज्ज्ञ, पालक आणि विद्यार्थी या सर्वांना आवाहन करीन की, आपल्या सर्वांचं ध्येय एक आहे. आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेत आहोत.
Web Title: Student Protest For Online Exam In Maharashtra State Home Minister Ordered To Police For Inquiry
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..