ऑगस्टमध्ये अभ्यासक्रमास सुरुवात होणार... ‘हे’ ॲप मोबाईलमध्ये घेऊन ठेवा

Online Course.jpg
Online Course.jpg

पुणे : अनेक दिवसांपासून सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत विचार करून पहिल्या आणि दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत. आता नवीन वर्ष सुरु करण्यासाठी कोरोना संकटाचा विचार करता महाविद्यालयात सर्व विद्यार्थी येऊ शकणार नाहीत. यासाठी विद्यापीठातील शिक्षकांनी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वयंम, गुगलमीट,क्लासरुम, मीट आणि झूम हे अँप मोबाइलमध्ये डाउनलोड करण्यास सांगितले आहे. ऑगस्टमध्ये अभ्यासक्रमास सुरुवात केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

कोरोनामुळे विद्यार्थी घरबसल्या सोशल मीडियाद्वारे अभ्यास करत आहेत. महाविद्यालयातील शिक्षक व्हाट्सअँप ग्रुप आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शैक्षणिक चर्चा घडवून आणण्यात आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना घरबसल्या अभ्यास करता येणे सोपे झाले आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात लॉकडाउनमुळे या कालावधीचा सकारात्मक दृष्टीने विचार करतच विद्यापीठाने घरबसल्या अभ्यासक्रम व चर्चा होण्यासाठी कॉलिंगला सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत अभ्यासक्रमाचे घटक याप्रमाणे वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण विषयांवर व्हिडिओ, व्हाट्सअँपवर व्हिडिओकॉल अशी चर्चा घडवून आणत आहेत. संचारबंदीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व्हाट्सअँपद्वारे विद्यार्थ्यांना अपडेट सांगितले जात आहे. काही दिवसातच स्वयंम, गुगलमीट, क्लासरुम, मीट आणि झूम अँपवर अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे.  कोरोनामुळे निर्माण झालेली सद्यस्थिती भयावह आहे. परिस्थिती भितीदायक असली तरीही परिस्थिती बदल घडवून आणण्यास सक्षम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लॉकडाऊनमध्ये सार काही बंद असतानाही शिक्षण क्षेत्रात लक्षणीय बदल घडून आल्याचे चित्र दिसून येत आहे.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर म्हणाले, कोरोना व्हायरसमुळे सध्या लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे विद्यापीठ बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे आता नवीन वर्षातील विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी प्रत्येक विभागाने गरजेनुसार काही साधने निवडली आहेत. त्यात गुगलमीट,क्लासरुम आणि व्हिडिओकॉलवर संपर्क साधून तसेच पीडीएफ आणि लिंक देऊन अभ्यासक्रम सुरु करणार आहोंत. ऑगस्टमध्ये अभ्यासक्रमास सुरुवात केली जाणार आहे. घरच्या घरी असलेल्या साधनांचा प्रभावी वापर करून मार्गदर्शन करणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com