अमेझॉनच्या माध्यमातून राज्यातील आदर्श शाळांमध्ये विद्यार्थ्याना मिळणार टॅब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amazon
अमेझॉनच्या माध्यमातून राज्यातील आदर्श शाळांमध्ये विद्यार्थ्याना मिळणार टॅब

अमेझॉनच्या माध्यमातून राज्यातील आदर्श शाळांमध्ये विद्यार्थ्याना मिळणार टॅब

मुंबई - राज्यातील आदर्श शाळांमध्ये (School) शालेय शिक्षण (School Education) घेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना (Student) लवकरच मोफत टॅब (Free Tab) मिळणार आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागाने अमेझॉन (Amazon) या कंपनीसोबत शैक्षणिक देवाण-घेवाण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला असून या उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी 28 जानेवारी रोजी, सकाळी 10 वाजता, सह्याद्री अतिथीगृहावर होणार आहे.

ऑनलाइन शिक्षण मिळवून देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मागील दोन वर्षात अनेक उपक्रम राबवले. त्याच पार्श्वभूमीवर अमेझॉन कंपनीसोबत हा नवीन उपक्रम राबवला जाणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या कार्यक्रमात मुंबईतील धारावी आदी परिसरातील असलेल्या महापालिकेच्या शाळातील काही ठराविक विद्यार्थ्यांना त्यात देऊन या कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, यांच्यासह शालेय शिक्षण सचिव वंदना कृष्णा, प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण संचालकांना सोबतच शालेय शिक्षण आयुक्त आदी वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा: राज्यातील सुमारे २ लाखांहून अधिक अंगणवाडी सेविकांना डिसेंबर महिन्याचे अद्याप मानधन नाही

विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्याचा हा कार्यक्रम राज्यामध्ये असलेल्या सर्व आदर्श शाळांमध्ये सुरुवातीला राबवला जाणार आहे त्यानंतर या कार्यक्रमाची यश लक्षात घेऊन त्यासाठीची पुढील नियोजन केले जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकारी सूत्राने दिली. शालेय शिक्षण विभागाकडून आणि त्याच्या प्रादुर्भावनंतर पहिल्यांदाच एका खाजगी कंपनीसोबत उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करून दिला जाणार आहे. हा टॅब विद्यार्थ्यांना सुरुवातीला शाळांमध्ये वापरण्याविषयी अमेझॉन कंपनीकडून तसेच शिक्षण विभागातील एसीईआरटीकडून लवकरच कार्यक्रमाचे नियोजन हे केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

Web Title: Students Get Tabs In Ideal Schools Maharashtra State Through Amazon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top