घरात बसूनच करा बारावीचा अभ्यास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

पीडीएफ पुस्तके
युवकभारती मराठी, संस्कृत अल्हाद, पाली-पकासो, अर्धमागधी-प्राकृत, महाराष्ट्री प्राकृत, युवकभारती हिंदी, युवकभारती बंगाली, युवकभारती इंग्रजी, युवकभारती गुजराती, युवकभारती उर्दू, युवकभारती सिंधी, युवकभारती सिंधी, युवकभारती कन्नड, युवकभारती तेलुगू, शिक्षणशास्त्र, पर्शियन गुल्हा ए फारसी, अरेबिक हिदायतुल अरेबिया, तर्कशास्त्र, बालविकास, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व संख्याशास्त्र (कला व विज्ञान भाग १), गणित व संख्याशास्त्र (कला व विज्ञान भाग २), गणित व संख्याशास्त्र (वाणिज्य भाग १), गणित व संख्याशास्त्र (वाणिज्य भाग २), पुस्तकपालन व लेखाकर्म, सहकार, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, चिटणीसाची कार्यपद्धती, अर्थशास्र, जलसुरक्षा व पर्यावरण शिक्षण, इतिहास, राज्यशास्र, माहिती तंत्रज्ञान विज्ञान.

बालभारतीच्या संकेतस्थळावर पीडीएफ पुस्तके उपलब्ध
मुंबई - बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अभ्यासक्रमाचे साहित्य पीडीएफ स्वरूपात ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्र्यांनी नुकतीच राज्यातील अधिकाऱ्यांसह ‘झूम’ ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यंदा बारावीच्या अभ्यासक्रमाची पुस्तके बदलली असली, तरी कोरोनाच्या संकटामुळे बाजारात आलेली नाहीत. त्यामुळे बारावीची पुस्तके पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार बालभारतीने ही पुस्तके पीडीएफ स्वरूपात http://www.ebalbharati.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहेत. रेडिओ आणि टीव्ही या माध्यमांतूनही अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्याबाबतही पडताळणी सुरू आहे.

शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना दुकानांतून नवी पुस्तके मिळतात. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन असल्यामुळे विद्यार्थी व पालकांना घराबाहेर पडणे शक्‍य होत नाही. त्यामुळे बालभारतीच्या संकेतस्थळावर ई-साहित्य उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना घरातच बसून अभ्यास करता येईल. ऑनलाइन उपलब्ध करण्यात आलेल्या पुस्तकांमधे मराठी, हिंदी, संस्कृत, गणित, विज्ञान, तर्कशास्त्र, माहिती व तंत्रज्ञान आदी विषयांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Study twelth in your home