भाजपवरील विश्वासामुळे सांगली महापालिकेत यश : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वास नव्हता म्हणून आघाडी करावी लागली. आता या दोन्ही पक्षांमध्ये विश्वास उरला नाही, हे आता होत आहे. सांगली महापालिकेतील काँग्रेसच्या कार्यकाळातील सर्व गैरव्यवहांची चौकशी करणार असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

सांगली : भाजपच्या एकदिल आणि सांघिक कामगिरीमुळे सांगली महापालिकेत पक्षाला यश मिळाले आहे. तसेच काँग्रेसवरील अविश्वास काँग्रेसच्या या पराभवाचे कारण असल्याचे समजते, असे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. जनतेचा भाजपवरील विश्वासामुळे सांगली महापालिकेत पक्षाला यश मिळाले, असेही पाटील म्हणाले. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वास नव्हता म्हणून आघाडी करावी लागली. आता या दोन्ही पक्षांमध्ये विश्वास उरला नाही, हे आता होत आहे. सांगली महापालिकेतील काँग्रेसच्या कार्यकाळातील सर्व गैरव्यवहांची चौकशी करणार असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले. याशिवाय 'टाईम बाँड' घालून चौकशी करून निकाल लावणार आहे. जळगाव आणि सांगलीची निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जनतेने काँग्रेसला स्पष्टपणे नाकारल्याचे दिसत आहे. त्यानंतर आता काँग्रेस 'ईव्हीएम'वर शंका उपस्थित करत आहे. काँग्रेसचा हा प्रकार म्हणजे नाचता येईना, अंगण वाकडे असा आहे, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली. 

दरम्यान, आता भाजपविरोधी वातावरण आहे, असे भासविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, जनता आमच्यासोबत आहे. सरकार आपले काम वेगळ्या पद्धतीने करत आहे. भाजपवर लोकांचा अजूनही विश्वास आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success in Sangli Municipal Corporation due to BJPs faith says Chandrakant Patil