
पाली : पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सुधागड तालुक्यातील पडसरे गावाला जोडणारा पुल अक्षरशः मोडकळीस आला असून धोकादायक अवस्थेत आहे. हा पुल पडसरे गावाला व येथील आदिवासी आश्रमाशाळेला सुधागड तालुक्यातील सर्व गावांशी जोडतो. परिणामी पडसरे आश्रमशाळेतील शेकडो विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, येणारे पर्यटक व ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे.