esakal | यंदा राज्यातील धरणांतील पाणीसाठ्यात दहा टक्‍क्‍यांनी वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा राज्यातील धरणांतील पाणीसाठ्यात दहा टक्‍क्‍यांनी वाढ

सातारा जिल्ह्यातील धोम बलकवडी, कण्हेर , कोयना, वीर धरणात देखील गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. नीरा खोऱ्यातील गुंजवणी धरणात (49.42), नीरा देवधर (23.57), भाटघर (37.02), वीर (39.33) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. 

यंदा राज्यातील धरणांतील पाणीसाठ्यात दहा टक्‍क्‍यांनी वाढ

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : देशासह महाराष्ट्रात गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाउन कमी जास्त प्रमाणत  असल्याने जलसंपदा विभागातील सर्वच क्षेत्रातील कार्यालय बंद होते. त्यामुळे कारखान्यांसह हाॅटेल व्यावसायिकांना आवश्यक असणारे पाण्याचा खूप अल्प प्रमाणात वापर झाला. परिणामी  राज्यातील सर्वच धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सध्या राज्यातील विभागीय धरणांत 34.83 टक्के उपयुक्त पाणीसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील आजपर्यंतचा पाणीसाठा दहा टक्‍क्‍यांनी अधिक असल्याचे जलसंपदान विभागाने स्पष्ट केले आहे. 

राज्याच्या जलसंपदा विभागातून मिळालेल्या माहितीनूसार विभागीय धरणे व त्यातील पाणीसाठा असा : अमरावती विभागातील 10 मोठ्या प्रकल्पांत 42.32 टक्के पाणीसाठा आहे, तर अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात (59.54), अमरावती जिल्ह्यातील वर्धा (67.97), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (51.26), यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरणात 47.6 टक्के, औरंगाबाद विभागातील नऊ मोठ्या प्रकल्पांत 41.25 टक्के, पैठण येथील प्रकल्पात 41.42 टक्के, हिंगोली जिल्ह्यातील येलदरी 64.89 टक्के, सिद्धेश्वर 51.51 टक्के, निम्न तेरणा व सीना कोळेगाव धरणात अनुक्रमे 1.77 व शून्य टक्के, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणात 44.27 टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील असोळमेंढा (90.37), नागपूर जिल्ह्यातील वडगाव (68.2), तोतलाडोह (82.48), कामठी खैरी (73.02), वर्धा जिल्ह्यातील निम्नवर्धा (71.74) टक्के, नाशिक विभागातील 24 मोठ्या प्रकल्पात 33.82 टक्के पाणीसाठा आहे. 

सातारकरांनाे... आता तुम्हांला कोरोनाचा अहवाल फटाफट समजणार, काळजी घेणेही साेपे झाले

नाे एन्ट्री...अन्यथा तुम्हांला या गावात श्री शंभू महादेवाचे दर्शन पडेल हजार रुपयांना

याबराेबरच नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणात (51.27), जळगाव जिल्ह्यातील वाघूर (78.26), पालघर जिल्ह्यातील धामणी (45.79), ठाणे जिल्ह्यातील भातसा (47.39) टक्के, कोल्हापूर जिल्ह्यातील तुळशी धरणात (51.56), राधानगरी (60.64), तिल्लारी (30.83) टक्के इतका पाणीसाठा आहे. सातारा जिल्ह्यातील धोम बलकवडी, कण्हेर , कोयना, वीर धरणात देखील गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. नीरा खोऱ्यातील गुंजवणी धरणात (49.42), नीरा देवधर (23.57), भाटघर (37.02), वीर (39.33) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. 
Edited By : Siddharth Latkar

काॅंग्रेस नेत्याचे ठाकरेंना पत्र ; फडणवीसांच्या काळात 'या' कंपन्या महाराष्ट्रात आल्याच नाही, निदान आता तरी...