Sugar factory Sugar rate
sakal
सोमेश्वरनगर (जि. पुणे) - केंद्र सरकारने साखरेचे मूल्य वाढविण्यात टाळाटाळ केली, अखेर निसर्गानेच साखरेची किंमत गुरुवारी (ता. २) प्रतिक्विंटल चार हजारांवर नेऊन ठेवली. दुष्काळाचे संकट घोंगावू लागल्याने राज्यातील कारखान्यांना प्रथमच साखरेसाठी चार हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिकचे दर मिळाले. मागील आठवडाभरात दोनशे ते अडीचशे रुपये प्रतिक्विंटलची वाढ नोंदवली गेली. यामुळे आर्थिक गर्तेत निघालेल्या कारखान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.