esakal | साखर उत्पादनात 25 टक्‍क्‍यांनी वाढ ! जानेवारीअखेर देशात 176.8 लाख टन साखर उत्पादन 
sakal

बोलून बातमी शोधा

sugar

चालू गळीत हंगामात पहिल्या चार महिन्यात जानेवारीअखेर देशात 176.8 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत साखर उत्पादनात 25 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) ही आकडेवारी जाहीर केली आहे. 

साखर उत्पादनात 25 टक्‍क्‍यांनी वाढ ! जानेवारीअखेर देशात 176.8 लाख टन साखर उत्पादन 

sakal_logo
By
प्रदीप बोरावके

माळीनगर (सोलापूर) : चालू गळीत हंगामात पहिल्या चार महिन्यात जानेवारीअखेर देशात 176.8 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत साखर उत्पादनात 25 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) ही आकडेवारी जाहीर केली आहे. 

मागील हंगामात या कालावधीत देशात 141 लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदाच्या हंगामात ऑक्‍टोबर ते डिसेंबरदरम्यान साखरेची विक्री गतवर्षीच्या तुलनेत कमी-अधिक प्रमाणात सारखीच आहे. ती 67.5 लाख टन इतकी झाली आहे. गतवर्षीच्या हंगामात देशात एकूण 274.2 लाख टन साखर उत्पादन झाले होते. त्या तुलनेत यंदा त्यापेक्षा अधिक म्हणजे 302 लाख टन साखर उत्पादन होण्याचा "इस्मा'चा अंदाज आहे. 

यंदाच्या हंगामात जानेवारीअखेर देशात 491 साखर कारखाने सुरू आहेत. गतवर्षी या कालावधीत 447 कारखाने चालू होते. साखर उत्पादनात देशात अग्रेसर असलेल्या उत्तर प्रदेशात 54.4 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. मागील हंगामापेक्षा ते किंचित कमी आहे. गतवर्षी या कालावधीत तेथे 54.9 लाख टन साखर उत्पादन झाले होते. उत्तर प्रदेशच्या तुलनेने महाराष्ट्रात यंदा साखर उत्पादनात वाढ झाली आहे. महाराष्ट्रात जानेवारीअखेर 63.8 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गतवर्षी या काळात महाराष्ट्रात 34.6 लाख टन साखर उत्पादन झाले होते. 

कर्नाटकात देखील यंदा साखर उत्पादनात वाढ झाली असून तेथे 34.3 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. मागील हंगामात तेथे या काळात 27.9 लाख टन साखर उत्पादन झाले होते. गुजरातमध्ये यंदा पाच लाख 55 हजार टन तर तमिळनाडू, आंध्र प्रदेश व तेलंगणात मिळून तीन लाख 56 हजार टन साखर उत्पादन झाले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image