महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सुमित्रा महाजन?

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जून 2019

- इंदूर लोकसभा मतदारसंघातून सलग आठवेळा झाल्या खासदार.

- लोकसभा अध्यक्षा म्हणून पार पाडली जबाबदारी.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए-2) सरकार स्थापन झाले. त्यानंतर आता विविध राज्यांतील राज्यपाल बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना राज्यपालपद मिळण्याची शक्यता आहे.  

पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी दोन दिवसांपूर्वी पार पडला. त्यानंतर काल (शुक्रवार) मोदी सरकारमधील मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. या खातेवाटपानंतर विविध राज्यांतील राज्यपाल बदलण्याचे संकेत दिले जात आहे. यामध्ये महाराष्ट्रासाठी सुमित्रा महाजन यांचे नाव चर्चेत आहे. सुमित्रा महाजन यांनी सलग आठवेळा इंदूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व केले. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपकडून तिकीट नाकरण्यात आले होते. त्यामुळे आता सुमित्रा महाजन यांना राज्यपालपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान, सुमित्रा महाजन यांची राज्यपालपदी निवड झाल्यास त्यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या लेकीला राज्याचे प्रमुखपद मिळणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sumitra Mahajan may be is the Governor of Maharashtra