
मुंबई : आदर्श नेतृत्व, सुशासन आणि लोककल्याणकारी राज्य कारभाराचे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रेरणादायी उदाहरण आहेत. चौफेर व्यासंग, प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून न्याय, पारदर्शकता आणि धार्मिक सहिष्णुता असे आदर्शवत जीवन जगणाऱ्या अहिल्यामाता यांचे कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणादायी असल्याचे मत लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती त्रिशताब्दी समारंभानिमित्त मुंबईतील ‘अहिल्यादेवी होळकर : एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व’ परिसंवादाच्या उद्घाटनावेळी बोलत होत्या.