खाद्यजत्रा खरेदीयात्रा (SUNDAY स्पेशल)

Sunday-Special
Sunday-Special

दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं नाही. म्हणून महाराष्ट्राची खाद्यजत्रा आणि खरेदीची यात्रा घडविण्याचा प्रयत्न... 

नागपूर जिल्हा
काय खाल?  

 नागपूरची संत्री, संत्रा बर्फी, तर्री पोहे, पाटोडी, सावजी मटण, सोनपापडी, मटका रोटी, राम भंडारची लस्सी, काजू कतली. 

घेण्यासारखे 
 खादीचे कपडे, दगडांच्या मूर्ती, लाकडाचे वैशिष्ट्यपूर्ण फर्निचर 

पाहण्यासारखे 
 भोसलेकालीन रामटेक गडमंदिर, रामटेकचे कालिदास स्मारक, नागपुरातील टेकडी गणेश मंदिर, अंभोऱ्याचा पंचनद्या संगम, उमरेड-कऱ्हांडला जंगल सफारी, गोरेवाडा जंगल सफारी, कोराडीचा ड्रॅगन पॅलेस, चिचोलीचे बाबासाहेब आंबेडकर शांतिवन, दीक्षाभूमी, अजब बंगला. 

वर्धा जिल्हा 
काय खाल?  

 गायीचे दूध आणि तुपापासून बनवलेले गोरसपाक. वर्धा तालुक्‍यातील समाधान आणि हिंगणघाटचा भंबामलचा बटाटा वडा, सेलूचे दही कलाकंद. 

घेण्यासारखे 
 खादी : महात्मा गांधीजींच्या वास्तव्यामुळे विविध प्रकारची खादी. 

पाहण्यासारखे 
 बापूकुटी : सेवाग्राम येथील महात्मा गांधींचा आश्रम. वर्धा रेल्वे, बसस्थानकापासून आठ किलोमीटरवर. 
 पवनार आश्रम : "भूदान'चे प्रणेते आचार्य विनोबा भावेंची आध्यात्मिक प्रयोग भूमी. 
 बोर अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प 

चंद्रपूर जिल्हा 
काय खाल?  

 चना पोहे, वडे, बालाजीचा उपमा, मामाची जिलेबी. 
 हटके खाद्यपदार्थ ः मटनासोबत लांब पोळ्या 

घेण्यासारखे 
 बांबूपासून बनवलेल्या वस्तू, आनंदवनात बनवलेल्या चादरी, जोडे, हस्तकला शिल्प. भद्रावतीच्या ग्रामोद्योग संघातील मातीच्या वस्तू. 

पाहण्यासारखे 
 ऐतिहासिक वास्तू, राणी हिराईचा वाडा, बिरशहाची समाधी, ऐतिहासिक मंदिरे, किल्ले. 
 गोंडकालीन रामाळा तलाव. भद्रावती येथील नाग मंदिर, जैन मंदिर, बुद्धलेणी. 
 चिमूरचे हुतात्मा स्मारक, बालाजी मंदिर. जिवती येथील माणिकगड किल्ला. 
 पर्यटन स्थळ : ताडोबा अभयारण्य, घोडाझरी तलाव, आसोलामेंढा जलाशय, आनंदवन प्रकल्प, मुक्ताई धबधबा, रामदेगी. 

साईबाबांची शिर्डी 
काय खाल?  

 दाक्षिणात्य पदार्थ, पूर्वांचलवगळता बहुतेक राज्यांचे पदार्थ बनवणारी उपाहारगृहे. हिवाळ्यात पेरू. 

पाहण्यासारखे 
 "सबका मालिक एक' अशी शिकवण देणाऱ्या साईबाबांची समाधी, बाबांचे शंभर किलो सोन्याचे सिंहासन, कळस, बाबांनी वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय, द्वारकामाई मंदिर, चावडी. 
 ऐंशी किलोमीटरवर शनीचे शिंगणापूर, पंधरा किलोमीटरवर दैत्यगुरू शुक्राचार्य, त्यांचा शिष्य कचदेवाचे मंदिर, राघोबादादांचा वाडा, सद्‌गुरू उपासनी महाराज संस्थान. येथे महिला वेदाध्ययन करतात. 

औरंगाबाद जिल्हा 
काय खाल?  

 तंदूरवरील मोगलाई नान रोटी. जगप्रसिद्ध "तारा'चे पान. 

घेण्यासारखे 
 सातवाहन काळापासून प्रसिद्ध रेशमी पैठणी. महंमद तुघलकासोबत आलेल्या विणकरांच्या वारसदारांनी बनवलेली हिमरू शाल. विशिष्ट विणीचे किनख्वाब कापड. 

पाहण्यासारखे 
 लेणी - अजिंठा, वेरुळ, औरंगाबाद, घटोत्कच, पितळखोरा, रुद्रेश्‍वर. 
 किल्ले - देवगिरी, अंतूर, सुतोंडा, वेताळवाडी, जंजाळा, लहूगड, रोहिलगड. 
 अभयारण्ये - गौताळा (कन्नड), जायकवाडी (पक्ष्यांसाठी-पैठण). 
 ऐतिहासिक - बीबी का मकबरा, पाणचक्की, छत्रपती शिवाजी पुराणवस्तू संग्रहालय. 
 पैठण - जायकवाडी धरण, संत एकनाथ मंदिर, नागघाट, तीर्थस्तंभ. 

लातूर जिल्हा 
काय खाल?  

 उजनीची (ता. औसा) प्रसिद्ध बासुंदी, निलंगा राईस, किसन हलवायाचे पेढे, आष्टा मोडचा (ता. चाकूर) चिवडा. 

पाहण्यासारखे 
 16 रस्त्यांची गंजगोलाई. किल्ले - औसा, उदगीर. खरोसा लेणी (ता. औसा) 

उस्मानाबाद जिल्हा 
काय खाल?  

 सरमकुंडी फाटा येथील कुंथलगिरीचा पेढा, खवा 

पाहण्यासारखे 
 तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर, नळदुर्गचा भुईकोट किल्ला, तेर येथील त्रिविक्रम, उत्तरेश्‍वर, संत गोरा कुंभार मंदिर, रामलिंग लामतुरे पुराणवस्तू संग्रहालय. 

बीड जिल्हा 
काय खाल?
 
 धारूरचा खवा आणि सीताफळे, नेकनूरचा हूर आंबा 

पाहण्यासारखे 
 मंदिरे ः बीडमधील कंकालेश्‍वर, अंबेजोगाईचे योगेश्‍वरी, बाराखांबी सकलेश्‍वर. आद्यकवी मुकुंदराज समाधी, किल्ले धारूरचा भुईकोट किल्ला. राक्षसभुवनचा (ता. गेवराई) गोदाघाट. मन्मथस्वामींचे कपिलधार तीर्थक्षेत्र. सौताड्याचा धबधबा. नायगावचे मयूर अभयारण्य. 

अक्कलकोट 
काय खाल?  

 कडक ज्वारी, बाजरी भाकरी आणि शेंगा चटणी. एवन चौकातील "लोकमान्य'ची कटभजी, यशवंत चव्हाणांचा पुणेरी वडापाव. सांगवी खुर्दच्या कापसेंचा सेंद्रिय रस आणि काकवी. अक्कलकोट स्टेशनजवळ वनिता तांबकेंची चवदार चकली. कुरनूर धरणातील मासे. 
 हटके पदार्थ - उडगीच्या रमेश जिगजंबगींची लज्जतदार बासुंदी, सीमावर्ती तोळणूरमधील कवटगींचा खमंग शेव-चिवडा. 

घेण्यासारखे 
 शिवपुरी संस्थानची परदेशात प्रचंड मागणीची उदबत्ती. 
 तोळणूरच्या नदाफांचे प्रसिद्ध ऊबदार लोकरी झान. 
 उडगी येथील शिवानंद सुतार यांचे रथ, सागवानी वस्तू. 
 जेऊरच्या रूपाली कणमुसेंच्या बचत गटाचे सॅनिटरी नॅपकिन, साबण. 

पाहण्यासारखे 
 अक्कलकोटचा संस्थानकालीन नवीन राजवाडा, तेथील शस्त्रागार. 
 श्रीस्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथील शिवशिल्पसृष्टी, समर्थवाटिका, शिवपुरी अग्निहोत्र केंद्र. 
 अक्कलकोट येथील श्रीस्वामी समर्थ मंदिर, समाधी मठ, राजेराय मठ, अन्नछत्र मंडळ. शेख नुरोद्दीन बाबा दर्गाह, ख्वाजा सैफुल मुल्क दर्गाह (हैद्रा). 

पंढरपूर 
काय खाल?  

 चमचमीत बाजार आमटी, स्वादिष्ट बासुंदी, आदमिलेंची चटपटीत भेळ. हटके पदार्थ - पेंडपाला. 

घेण्यासारखे 
 श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्या सुबक, आकर्षक दगडी, पितळ तसेच सिरॅमिकच्या मूर्ती. ऊबदार घोंगडी, भागवत संप्रदाय, अध्यात्मावरील ग्रंथ. 

पाहण्यासारखे 
 मंदिरे - श्री विठ्ठल-रुक्‍मिणी, श्री गोपाळपूर, चंद्रभागेच्या पात्रातील प्राचीन श्री विष्णुपद, पखालपूरचे श्री गणपती, कोर्टीचा श्री महादेव आणि इस्कॉन मंदिर. नारायण चिंचोलीचे प्राचीन सूर्यनारायण मंदिर 
 मठ - श्रीसंत कैकाडी महाराज, श्रीसंत तनपुरे महाराज, श्री गजानन महाराज. 
 यमाई तलावालगतचे तुळशी वृंदावन 

नाशिक 
काय खाल?  

 प्रसिद्ध मिसळ (साधना, मयूर, तुषार, मखमलाबादची रामूची, पंचवटीतील भगवती, अंबिका, सीताबाईची). 
 बुधा हलवाईची जिलबी. 
 ओझरखेड धरणातील मासे, शेवाळे अननस सरबत, "सायंतारा' साबूदाणा वडा. 
 मांसाहारीसाठी - दिवट्या बुधल्या, कोकणी दरबार, काका का ढाबा, जयेश आणि तुळजा खानावळ. 
 वाइन - सुला, सोमा, यॉर्क. 

घेण्यासारखे 
 द्राक्ष, बेदाणा, वाइन, डाळिंब, कोंडाजी, मकाजी, माधवजी आणि नाशिकचा चिवडा. 
 येवल्याची पैठणी, पितळ आणि तांब्याची भांडी, ढोल आणि रुद्राक्ष माळा. 

पाहण्यासारखे 
 पंचवटी परिसर (रामकुंड, काळाराम मंदिर, कपालेश्‍वर, इंद्रकुंड, तपोवन). चामरलेणी, त्रिरश्‍मी लेणी, फाळके स्मारक, मुक्तिधाम. 
 मांगीतुंगी, विल्होळीतील जैन मंदिर, सिन्नरचे गोंदेश्‍वर मंदिर आणि गारगोटी संग्रहालय, त्र्यंबकेश्‍वरचे ज्योतिर्लिंग, सप्तशृंगीदेवी, नांदूरमध्यमेश्‍वरचे पक्षी अभयारण्य. 
 महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर, अंजनेरीचे नाणी संशोधन केंद्र, इगतपुरीचे धम्मगिरी विपश्‍यना केंद्र, कळसुबाईचे शिखर, भगूरचे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान, रामशेजचा किल्ला. 

पुणे 
काय खाल?  

 पारंपरिक आणि कॉस्मोपोलिटन पदार्थ सहजपणे मिळतात. 
 वडा - प्रभा आणि टिळक स्मारक मंदिरातील, तसेच "अन्नपूर्णा'. चवी वेगळ्या; पण लक्षात राहतील अशा. 
 मिसळ - बेडेकर, साईछाया, रामनाथ, श्री, संजीवनी, श्रीमंत, काटा किर्र. सगळ्याच चवदार, आपापली मिजास जपणाऱ्या आणि कल्याण, गणेश भेळ. 
 इडली-सांबार, डोसा ः वाडेश्‍वर, रूपाली, वैशाली. 
 सुजाता मस्तानी, कावरे आइस्क्रीम : वर्षभर. 
 चितळे बाकरवडी, बुधानी वेफर्स, लक्ष्मीनारायण चिवडा : याची पॅकिंग जगभर जातात. 
 थाळी स्पेशल : श्रेयस, दूर्वांकुर, आशा, रसोई, कृष्णा, शबरी, पूना गेस्ट हाऊस, स्वरूप, गिरिजा, भट. 
 पॅटीस - पूना, संतोष, हिंदुस्थान आणि ग्रीन बेकरी. खाऊघर आणि जहागीरदार. 
 मांसाहारी ः सदाशिव पेठेत सर्वाधिक; निसर्ग, मासेमारी, महेश, ब्लू नाईल, जे-वन. 
 गुडलक कॅफेचा खिमा पाव (डेक्कन). 
या सगळ्यांच्या जोडीला चहाची एकापेक्षा एक सरस ठिकाणे. 

घेण्यासारखे 
 तुळशीबाग : मुली, महिलांना दैनंदिन वापराच्या रास्त दरातील अॅक्‍सेसरीज. 
 लक्ष्मी आणि कुमठेकर रस्ता : पारंपरिक साड्यांची खरेदी. असंख्य व्हरायटीज. 
 डेक्कन : फॅशनेबल कपडे, पर्स, शूज, चपला रास्त दरात मिळतात. 
 कुंभारवाडा : मातीच्या वस्तू विविध व्हायटीजमध्ये उपलब्ध. 

पाहण्यासारखे 
 शनिवारवाडा, लालमहाल, पाताळेश्‍वर मंदिर, शिंदेछत्री, पर्वती, सारसबाग, केळकर संग्रहालय. 
 राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, कात्रज ः सुमारे 130 एकरात विविध प्रजातींचे जंगली प्राणी, सर्प. साडेतीनशेहून अधिक प्राणी. 
 आगाखान पॅलेस : शहरातील महत्त्वाची वास्तू. वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय. 
 सिंहगड : वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा प्रेक्षणीय गड. 
 चतुशृंगी मंदिर, फुलेवाडा, महालक्ष्मी मंदिर, ओशो गार्डन, एम्प्रेस गार्डन. 

कोल्हापूर 
काय खाल?  

 मिसळ ः फडतारे, चोरगे, बावडा, शाहू. सोळंकी आइस्क्रीम. घरगुती बनवलेला तांबडा-पांढरा रस्सा. वडापाव ः दीपक, शीतल, झाडाखालचा. राजाभाऊ भेळ. 

घेण्यासारखे 
 कोल्हापुरी साज, कोल्हापुरी चप्पल, सेंद्रिय गूळ, काकवी, घरगुती पद्धतीने बनविलेले सांडगे, पापड, कुरडया. 

पाहण्यासारखे 
 भवानी मंडप, जुना राजवाडा, महालक्ष्मी मंदिर, रंकाळा तलाव, नवीन राजवाडा, कणेरी मठ, कात्यायनी मंदिर. 

श्रीक्षेत्र जोतिबा 
काय खाल?  

 पुरणपोळी आणि गुळवणी 

घेण्यासारखे 
 चिरमुरे व राजिगिऱ्याचे लाडू 

पाहण्यासारखे 
 यमाई मंदिर, गायमुख तलाव, काही अंतरावर पोहाळे येथे पांडव लेणी. 

पन्हाळगड 
काय खाल?
 
 अस्सल कोल्हापुरी पद्धतीचे जेवण. तांबडा-पांढरा रस्सा, पिठलं-भाकरी. 

घेण्यासारखे 
 जंगलातली जांभळे, करवंदे, काजू, आंबे, फणस. 

पाहण्यासारखे 
 पन्हाळ्यापासून काही अंतरावर आंबा घाट परिसर, मानोली धरण, वाघझरा व ऐतिहासिक पावनखिंड, विशाळगड, हजारो फूट खोल दऱ्या, जंगल सफारीचा आनंद.

दाजीपूर-राधानगरी अभयारण्य 
 राजर्षी शाहू महाराजांचे राखीव जंगल. जागतिक वारसास्थळामध्ये परिसराचा समावेश. 

काय खाल?  
 करवंदं, जांभूळ असा रानमेवा, दुधाची आमटी, रक्ती-मुंडी, नाचणीची भाकरी, गावरान कोंबडी. 

घेण्यासारखे 
 जंगली मध 

पाहण्यासारखे 
 राधानगरी धरण. गव्यांसाठी तसेच जैवविविधतेसाठी प्रसिद्ध परिसरात तसेच वाघ, बिबटे आणि ब्लॅक पॅंथर. फुलपाखरांच्या विविध प्रजाती. 

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी 
 कृष्णा-पंचगंगा नदीच्या संगमावरचे कुरुंदवाडजवळील श्रीदत्त देवस्थान 
काय खाल?  
 उत्तम प्रकारचे शाकाहारी जेवण 

घेण्यासारखे
 नृसिंहवाडीचे पेढे, बासुंदी. 

पाहण्यासारखे 
 नृसिंहवाडी मार्गावरचे रामलिंग क्षेत्र, पट्टणकोडोलीचे विठ्ठल-बिरदेव मंदिर, जैनबांधवांचे तीर्थस्थळ बाहुबली, खिद्रापूरचे कोपेश्‍वर मंदिर. 

मालवण 
काय खाल?  

 अस्सल मालवणी तिखट भाजीचा वडापाव. "अतिथी बांबू'मधील माशाचे जेवण. विजया बेकरीची आरोग्यवर्धक बिस्किटे, हॉटेल चैतन्यमधील भरपेट सोलकढी जेवण. 

घेण्यासारखे 
 शिंपले आणि काथ्यापासून बनवलेल्या वस्तू. 

पाहण्यासारखे 
 सिंधुदुर्ग किल्ला, रॉक गार्डन, देवबागमधील संगम पॉइंट, तारकर्लीचा किनारा, मोरयाचा धोंडा आणि चिवला बिच. 

सावंतवाडी 
काय खाल?  

 बाळकृष्ण कोल्ड्रिंक हाउसमधील कॉकटेल, हॉटेल चंदू भवनमधील भाजी-पाव, महालक्ष्मी भोजनालयचे (भालेकर खानावळ) अस्सल मालवणी जेवण, साधले मेसचे शाकाहारी जेवण. 

घेण्यासारखे - 
 लाकडी खेळणी 

पाहण्यासारखे 
 नरेंद्र डोंगरावरील जैवविविधता, मोती तलाव, सावंतवाडी संस्थानचा राजवाडा आणि जगन्नाथराव भोसले उद्यान. 

गणपतीपुळे 
काय खाल?
 
 उकडीचे मोदक, हंगामात आमरस, काजूगराची उसळ. 

घेण्यासारखे 
 आंबापोळी, फणसपोळी, आटवलेले आमरस 

पाहण्यासारखे 
 गणपतीचे वैशिष्ट्यपूर्ण देवस्थान, भंडारपुळे किनारा, कऱ्हाडेश्‍वर मंदिर, मालगुंडचे केशवसुत स्मारक, पुतळ्यांचे संग्रहालय. 

मुंबई 
काय खाल?  

 महाराष्ट्रासह देश व जगभरातील हवा तो पदार्थ विविध ठिकाणी मिळतो.

काय पहाल? 
 गेटवे ऑफ इंडिया. वैविध्यपूर्ण फुले, झाडांपासून बनवलेल्या प्राण्यांच्या आकाराच्या शिल्पांचे हॅंगिंग गार्डन. "युनेस्को'ने जागतिक वारसास्थानाचा दर्जा दिलेली पाषाणात खोदलेली घारापुरीची लेणी (एलिफंटा केव्हज्‌). कला, विज्ञान, संस्कृतीचे जतन करणारे एशियाटिक ग्रंथालय. येथे दुर्मीळ पुस्तकांबरोबरच विविध भाषांतील हस्तलिखितांसह लाखावर ग्रंथ आहेत. यात अडीच हजार पोथ्या, हस्तलिखिते, बाराशेवर नकाशे आहेत. हिंदू, मुस्लिम, पाश्‍चिमात्य वास्तुरचनेच्या उत्कृष्ट नमुन्याचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. राणीचा बाग (राजमाता जिजामाता उद्यान) म्हणजेच बोटॅनिकल गार्डन. येथे पेंग्विनसह बिबट्या, कोल्हा, हरीण, हत्ती, पानघोडा, मगर इत्यादी प्राणी भेटतात. बिबट्या, हरणांच्या वावराचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजे मुंबईतील एकमेव जंगल. उद्यानात मधोमध काळा दगड तासून बनवलेली कान्हेरी लेणी. 

घेण्यासारखे 
 भुलेश्‍वर बाजारपेठ - खोटे दागिने आणि कपड्यांसाठी प्रसिद्ध. लेहगा, ट्रॅडिशनल कपडे मिळतात. गुजराती कपड्यांची मोठी बाजारपेठ. येथील दागिन्यांचे भाव मुंबईतल्या इतर बाजारपेठांतील भावापेक्षा निम्मे आहेत. 
 क्रॉफर्ड मार्केट - सर्वांत मोठे होलसेल मार्केट, सुकामेवा, चॉकलेटसाठी प्रसिद्ध मार्केट. वाजवी दरातील घरगुती सामान. मेकअपच्या समानांची मोठी दुकाने. किचन टूल्स येथे मिळतात. 

रायगड जिल्हा 
काय खाल?  

 आगरी-कोळी पद्धतीचे मांसाहारी खाद्यपदार्थ. नागली, तांदळाच्या भाकऱ्या, गौरी-गणपतीच्या सणात उदकाचे मोदक, नारळाच्या चवाची चिक्की, निरा. 

घेण्यासारखे 
 समुद्रातील शंख-शिंपले. सुकी मासळी. सफेद कांदा. हापूस, काजूच्या बिया. रानमेवा. विविध प्रकारचे पापड, लोणची. 

पाहण्यासारखे 
 गडकिल्ले : रायगड, सरसगड, अवचितगड, कुलाबा, जंजिरा. 
 समुद्र किनारे : अलिबाग, मुरूड, दिवेआगर, काशीद. 
 जंगल पर्यटन : कर्नाळा पक्षी आणि फणसाड वन्यजीव अभयारण्य. 

महाबळेश्वर 
 सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील समुद्र सपाटीपासून साडेचार हजार फुटांवरचे थंड हवेचे ठिकाण. ब्रिटीशकालीन वैभवसंपन्न आणि मनमोहक वाडे, इमारतींसाठी प्रसिद्ध. 

काय खाल?  
 स्ट्रॉबेरी, रास्पबेरी. विविध फ्लेवरचे फुटाणे, रानमेवा. 

घेण्यासारखे 
 वेताची काठी, हातमाग, चामड्याच्या वस्तू, रजई. 

पाहण्यासारखे 
 आर्थर सीट पॉइंट - सर्वात प्रसिद्ध. त्याच्या डावीकडे खोल दरीतून कोंकणात जाणारी सावित्री नदी, उजवीकडे घनदाट जंगल. येथून रायगड आणि तोरणा किल्ला दिसतो. याच मार्गावर टायगर स्प्रिंग, इको पॉइंट, एलफिन्स्टन पॉइंट. 
 इको पॉइंट - मनमोहक, नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध अशा इंको पॉइंटवरून खोल दऱ्या, उंच पर्वतांचे दर्शन होते. 
 वेण्णा लेक - 1842 मध्ये निर्मित सुमारे 28 एकरातील लेकमध्ये नौकाविहाराचा आनंद मिळतो. 
 बॉम्बे पॉइंट (सनसेट पॉइंट) - मावळत्या सूर्याचे दर्शन होते. 
 लिंगमळा धबधबा - पावसाळ्यातील सहलीसाठी उत्तम ठिकाण. 
 श्रीक्षेत्र महाबळेश्वर - जुन्या महाबळेश्‍वरमध्ये महादेव मंदिरासह अनेक धार्मिक स्थळे आहेत. तेराव्या शतकातील कृष्णाबाई मंदिरही आहे. 

पाचगणी 
 महाबळेश्वरपासून 18 किलोमीटरवरचे थंड हवेचे ठिकाण. टेबललॅंड, चित्रीकरणासाठी प्रसिद्ध. सुविधांनी परिपूर्ण निवासी शाळांसाठी प्रसिद्ध. 

काय खाल?  
 चिक्‍की, स्ट्रॉबेरी, आइस्क्रीम. 

घेण्यासारखे  
 मध, जॅम, जेली, चॉकलेट. 

पाहण्यासारखे 
 टेबललॅंड, मॅप्रो गार्डन. 

प्रतापगड 
 महाबळेश्वरपासून महाड रस्त्याला 21 किलोमीटरवरील प्रतापगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध केला होता. येथे शिवाजी महाराज यांनी स्थापलेले तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे. 

काय खाल? 
 खरडा-भाकरी, ताक. 

पाहण्यासारखे 
 कोकणातील पर्वतरांगा. 

कास पुष्प पठार 
 साताऱ्याच्या पश्‍चिमेकडे 22 किलोमीटरवर. दुर्मीळ फुलांच्या प्रजातींमुळे याचा "युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश. ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या काळात 280 प्रकारच्या फुलणाऱ्या रानफुले आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध. 

काय खाल?  
 साताऱ्यात कंदी पेढे, आंबा बर्फी. रानमेवा, नाचणीची भाकरी, ठेचा. 

पाहण्यासारखे 
 दुर्मीळ फुले, कुमुदिनी फुले, कास तलाव. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com