esakal | गोपीचंद पडळकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है...
sakal

बोलून बातमी शोधा

Support to the statement of MLA Gopichand Padalkar in Mangalvedha taluka

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा राष्ट्रवादी व इतर पक्षाच्या वतीने राज्यभरात अनेक ठिकाणी निषेध केला जात आहे.

गोपीचंद पडळकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है...

sakal_logo
By
गुरुदेव स्वामी

भोसे (सोलापूर) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा राष्ट्रवादी व इतर पक्षाच्या वतीने राज्यभरात अनेक ठिकाणी निषेध केला जात आहे. असे असताना मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे मात्र आमदार पडळकर यांच्या समर्थनार्थ ‘गोपीचंद पडळकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘आय सपोर्ट गोपीचंद पडळकर’, अशा प्रकारचे पत्रके हातात घेऊन त्यांच्या प्रतिमेला दुधाने अभिषेक घालण्यात आला.
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्‍वर येथील राजे मल्हारराव होळकर चौकात हा अभिषेक घालण्यात आला. आमदार पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली; म्हणून नंदेश्वर येथील पडळकर समर्थकांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन यांच्या प्रतिमेला दुधाने अभिषेक घालून पाठिंबा देत विविध घोषणा देण्यात आल्या. यावेळी सरपंच अनिल गरंडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर, मल्हार महासंघाचे तालुकाध्यक्ष अंकुश गरंडे, अहिल्यादेवी जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष वसंत गरंडे, गोपिचंद पडळकर युवा मंचाचे तालुकाध्यक्ष सचिनराजे करे, दामाजी शुगर्सचे माजी संचालक तातोबा बंडगर, दत्ताञय बंडगर, समाधान गरंडे यांच्यासह गोपिचंद पडळकर सर्मथक व ग्रामस्थ उपस्थित होते.