Shivsena Row : ठाकरे गटाला कोर्टाकडून दिलासा नाहीच! म्हणाले, उद्या या...

Maharashtra
Maharashtraesakal

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे राहील असा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणुक आयोगाच्या या निर्णयावर आक्षेप घेत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाचे दार ठोठवले. पण न्यायालयाने उद्या येण्याचे निर्देश दिले. (Supreme Court asks the lawyer to mention it tomorrow )

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला "शिवसेना" आणि "धनुष्य आणि बाण" हे चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत उद्धव ठाकरे गटाचे वकिल सुप्रीम कोर्टात पोहचले. मात्र, कोर्टाने तातडीने सुनावणी करण्यास नकार देत उद्या येण्याचे निर्देश दिले.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात दाखल झाले. ही याचिका आज सुप्रीम कोर्टासमोर मांडायचा/ मेन्शन करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाने केला. मात्र, कोर्टाने उद्या रीतसर मेन्शनिंग लिस्ट अंतर्गत यायला सांगितले. सुप्रीम कोर्ट सत्ता संघर्षासोबत ही याचिका ऐकणार की आधी हायकोर्टात पाठवणार? याकडे आता सर्वांचे लक्ष राहिल आहे.

याचिकेत नेमंक काय म्हटलं आहे?

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आजच सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका दाखल करण्यात आली आहे. अभिषेक मनु सिंघवी यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाबाबत तातडीचा ​​उल्लेख केला आहे.

मात्र, उद्याच्या यादीत उल्लेख करा, डावे, उजवे, काळे आणि पांढरे प्रत्येकासाठी समान नियम लागू होतील, असं म्हणत सरन्यायाधीशांनी मंगळवारी सुनावणी केली जाणार असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com