Kapil Sibal: तुम्ही अजूनही तरुण वकील आहात सिब्बलजी; न्यायमूर्तींची मिश्किल टिप्पणी

न्यायालयात न्यायमूर्तींच्या मिश्किल टिप्पणीने सर्वांचे लक्ष वेधले
Kapil Sibal
Kapil Sibal

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सलग दुसऱ्या दिवशी आज सुनावणी होत आहे. काल शिंदे गटाचे वकील हरीश साळवे, महेश जेठमलानी आणि नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. आज ठाकरे गटाकडून युक्तिवाद केला जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल कोणत्या मुद्द्यांकडे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष्य वेधतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच न्यायालयात न्यायमूर्तींच्या मिश्किल टिप्पणीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ( supreme court hearing thackeray vs shinde judge SG Mehta says You are still a young lawyer Kapil Sibal )

न्यायालयात नेमकं काय घडलं?

न्यायमूर्ती आणि वकिलांमध्ये होणाऱ्या चर्चांबाबत न्यायालयात कामकाजाच्या सुरुवातीलाच संवाद झाला. यावेळी कपिल सिब्बल म्हणाले की जेव्हा मी तरुण वकील होतो.. या वाक्यावर लागलीच न्यायमूर्ती एस. जी. मेहता यांनी “तुम्ही अजूनही तरुण वकील आहात सिब्बलजी” असं म्हणताच न्यायालयात हशा पिकला.

गेल्या सात महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सलग दोन दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. कालपासून ठाकरे गटाकडून जेष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंची कायदेशीर खिंड एकट्यानं लढवली आहे.

Kapil Sibal
H3N2 Deaths : ताप अंगावर काढू नका; राज्यात २ मृत्यू झाल्यावर आरोग्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना

कपिल सिब्बल हे देशभरात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या वकिलांपैकी एक असल्याचंही बोललं जातं. सिब्बल केवल वकिल नसून ते राजकारणीदेखील होते. कपिल सिब्बल यांना वकिलीपेशा वारसा म्हणून मिळाली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Ajit Pawar : "चंद्रकांत पाटील रात्री उशिरा जागत नाहीत मग त्यांना.. " अजित पवार विधानसभेत कडाडले

सिब्बल यांच्या वडिलांचे नाव देशातील दिग्गज वकिलांमध्ये येते. त्यांना इंटरनेशनल बार एसोसिएशनच्या लिविंग लेडेंड ऑफ लॉ या पदवीने सन्मानित करण्यात आले होते. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिब्बल यांनीही देशातील नामांकित वकील म्हणून नाव कमावलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com