Pradip Sharma Case : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; नियमित जामीन मंजूर

Pradip Sharma Case
Pradip Sharma Case esakal

मुंबईः एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा देत कायम जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधात प्रदीप शर्मा यांनी दाद मागितली होती.

प्रदीप शर्मा यांच्या जामीन आणि स्थगिती मागणीवर शुक्रवारी सुनावणी झाली. शर्मा यांना मुंबई पोलिसांकडे सरेंडर होण्याची अट रद्द करण्यात आली असून सर्वोच्च न्यायालयाच्या डबल बेंचने हे आदेश दिले आहेत.

Pradip Sharma Case
IPL 2024: जड्डूनं 'तो' विजयी चौकार पुन्हा ठोकला अन् चेन्नईकरांच्या गेल्या वर्षीच्या आठवणी ताज्या झाल्या

प्रदीप शर्मांच्या संबंधिची प्रक्रिया सात दिवसात पूर्ण करा, असे आदेश मुंबई सत्र न्यायालयाला दिले आहेत. न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय, न्यायमूर्ती प्रशांत मिश्रा यांच्या द्विसदस्य पिठाने हा निर्णय दिला.

Pradip Sharma Case
Naach Ga Ghuma: कौटुंबिक विनोदी चित्रपट; नात्याची गंमतीशीर गोष्ट मांडणारा ‘नाच गं घुमा’

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची लखनभैय्या हत्या प्रकरणात सेशन कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, उच्च न्यायालयानं हा निकाल फिरवून प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवलं होतं. त्या प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाने शर्मांना नियमित जामीन मंजूर केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com