Maratha Reservation Sakal
महाराष्ट्र बातम्या
Maratha Reservation : तुम्हीच आरक्षणावर मार्ग काढायला हवा; खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनस्थळी भेट देऊन मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका करत सर्वपक्षीय बैठकीची मागणी केली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांवर टीका करताना सुळे म्हणाल्या की, तुम्ही आमचे पक्ष फोडले, आमची घरे फोडली आणि सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री बनलात. मग आता सत्तेत आहात. सरकार तुमचे आहे आणि निर्णयही तुम्हाला घ्यायचा आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायचे की नाही हे तुम्ही आम्हाला काय विचारताय? आमच्यावर का टाकताय, याचा निर्णय आता तुम्हाला घ्यायचा आहे, हे विरोधकांवर टाकू नका, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.