Video : दोन्ही राज्यात भाजपचं सरकार, तरीही… ; कर्नाटकप्रश्नी सुप्रिया सुळे लोकसभेत संतापल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

supriya sule slam bjp over maharashtra karnataka border dispute in lok sabha winter session

Video : दोन्ही राज्यात भाजपचं सरकार, तरीही… ; कर्नाटकप्रश्नी सुप्रिया सुळे लोकसभेत संतापल्या

Maharashtra karnataka border dispute : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्ना मागच्या काही दिवसांपासून चागलाच पेटला आहे. काल बेळगाव-हिरेवागवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक झाल्याच्या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं पाहायला मिळालं. यानंतर सोकसेभेत देखील हा मुद्दा चांगलाच गाजला. लोकसभेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळे त्यांनी महाराष्ट्राची बाजू मांडत अमित शाह यांना या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी देखील त्यांनी केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गेल्या 10 दिवसांपासून एक नवा प्रश्न पुढे आला आहे. बाजूचं राज्य कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राविरोधात काहीही बोलत आहेत. कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राच्या लोकांना मारहाण करण्यात आली. आजपर्यंत एकावरही अद्याप कर्नाटक सरकारने कारवाई केलेली नाही.

हेही वाचा - Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

हेही वाचा: दिल्लीत 'आप' पुन्हा ठरलं बाप! पुण्यात रॅली काढत कार्यकर्त्यांचा जल्लोष

गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र रचले जात आहे. महाराष्ट्र तोडण्याची भाषा कर्नाटकचे मुख्यमंत्री करत आहेत. दोन्ही राज्यांत भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राविरोधात बोलत आहेत. काल लोकांना मारहाण करण्यात आली. हे चालणार नाही. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

हेही वाचा: Gujrat Exit Polls 2022 : मागच्या दोन निवडणुकांत एक्झिट पोल कसे होते? वाचा भाकितं किती ठरली खरी

"सध्या महाराष्ट्रात सीमावादाचा प्रश्न चिघळला आहे. महाराष्ट्र - कर्नाटक सिमावादाच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी पक्षाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत अतिशय आक्रमक भूमिका मांडली" असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुळेंचा संसदेतील व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान आजपासून (7 डिसेंबर) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असून या अधिवेशनात पहिल्याच दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर चर्चा झाली.